Author

राजन हर्षे | Rajen Harshe

Author's books

Saleनवी पुस्तके

पक्षी उन्हाचा – सात विद्यापीठांच्या आवारात | Pakshi Unhacha – Sat Vidyapithanchya Aawarat

320.00

विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि प्रशासक या पाच प्रकारच्या भूमिका निभावताना डॉ. राजन हर्षे यांनी पुणे, जेएनयू (दिल्ली), सियान्स पो (पॅरिस), कोलंबिया (न्यू यॉर्क), हैदराबाद, अलाहाबाद आणि एसएयू (दिल्ली) या सात विद्यापीठांच्या आवारात मुशाफिरी केली आहे. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन हा ध्येयवाद त्या सर्व भूमिकांना जोडणारा दुवा होता. तब्बल पाच दशकांच्या त्या प्रवासाचे एका जिप्सी वृत्तीने केलेले हे आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण आहे. या पुस्तकात बारा दीर्घ लेख आहेत. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाज जीवनावर भाष्य हे चार घटक या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे हे पुस्तक आत्मकथनात्मक वाटेल, प्रत्यक्षात हे एक प्रकारचे कार्यकथन आहे. मोठ्या निष्ठेने व सचोटीने कार्यरत राहताना, परिपूर्णतेचा ध्यास कसा बाळगता येतो आणि उपलब्ध अवकाशात किती परिणामकारक काम करता येते, याचे प्रतिबिंब या पुस्तकात दिसेल.

 

       

Saleनवी पुस्तके

सोन्याची मग होईल धरणी | Sonyachi Mag Hoil Dharani

250.00

या पुस्तकाचे शीर्षक मी बा. भ. बोरकर यांच्या बालपणी वाचलेल्या आणि माझ्या विशेष स्मरणात राहिलेल्या, ‘गड्यांनो तृणबाळे होवू’ या कवितेमधून घेतले आहे.

कवितेमधील ‘सोन्याची मग होईल धरणी’ ह्या ओळीने मला खूप प्रभावित केले. कारण मी जरी तृणपात्याइतका लहान असलो तरी, या धरतीला सोन्याची करण्याचा माझा संकल्प कायमच दृढ होता. त्यासाठी लागणारी नैतिक, सामाजिक आणि बौद्धिक बांधिलकी प्रत्येक येणाऱ्या दिवसाबरोबर वाढविण्यासाठी मी झटायला तयार होतो/आहे.

पण असे विश्व किंवा अशी धरती सोन्याची करायची असेल तर जगाची वस्तुस्थिती समजण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हेसुद्धा जरुरीचे असते. शिवाय सभोवतालच्या परिस्थितीचे सातत्याने परीक्षण करताना आत्मपरीक्षण करणेसुद्धा तितकेच जरुरीचे असते.

‘परीक्षण आणि आत्मपरीक्षण’ हे पुस्तकाचे उपशीर्षक नेमकी हीच गोष्ट सुचविते. या पुस्तकात कविता, राजकारण, थोर विचारवंतांचे विचार व त्या विचारांना साकारताना त्यांनी केलेले संघर्ष आणि उच्च शिक्षणाची जगातील व भारतातील सद्यःस्थिती इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण लेख आहेत.