Author

न्या. महादेव गोविंद रानडे | Nya. Mahadev Govind Ranade

Author's books

Saleनवी पुस्तके

धार्मिक व सामाजिक सुधारणा | Dharmik Va Samajik Sudharana

360.00

“युरोपीय देशांमध्येसुद्धा लसीकरणाला विरोध करणारे डॉक्टर आहेत, औषधे न घेता शरीर स्वतःहून बरे होईल असे मानणारे ‘शेकर ‘पंथीय लोक आहेत, पृथ्वी सूर्याभोवती फिरते व स्वतःच्या अक्षाभोवतीही फिरते या सत्यापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पुस्तकपंडित आहेत.

अनेक महान बुद्धिमान व्यक्तींमध्येही विरोधाभासाविषयीचे प्रेम दिसून येते. या दुबळेपणाला ते कवटाळून असतात आणि त्यांच्या इतर कार्यांमधील श्रेष्ठत्व वाढू लागले की, त्यासोबत बांडगुळाप्रमाणे या दुबळेपणाचीही वाढ होत जाते. या अनैसर्गिक घडामोडी बाजूला ठेवल्यावर असे स्पष्ट होते की, प्रत्येक देशात लोकमताला आकार देणारे व एकंदर समुदायाला सजग करणारे बऱ्यापैकी अल्पसंख्याक असतात आणि त्यांच्या मनात वाजवी निर्धार निर्माण करायला वाव आहे. विचार न करणाऱ्या प्रचंड बहुसंख्याकांना यात गणता येणार नाही.”

न्या. महादेव गोविंद रानडे

(सामाजिक प्रश्नांबाबतचे सरकारी कायदे)

    

Saleनवी पुस्तके

संकीर्ण निबंध | Sankirna Nibandha

480.00

“सर्वंकष दृष्टीने पाहिले तर इथे मांडलेले चित्र अजिबात समाधानकारक नाही, हे खरे आहे. मराठी भाषेने प्रगतीचा जो टप्पा सध्या गाठला आहे, त्यात पूर्णत्वास गेलेले गतकालीन यश नसून भविष्यासाठीची आश्वासकता दिसते आहे, या दृष्टीने त्याचे कौतुक व्हायला हवे. चाळीस वर्षांच्या तुटपुंज्या कालावधीचा विचार केल्यावर मात्र आपल्याला एवढ्याशा काळात झालेल्या कामाचे प्रमाण पाहून आश्चर्य वाटते. विशेषतः या इलाक्यातील भगिनी भाषांचे तुलनात्मक दारिद्र्य लक्षात घेता मराठीतील काम लक्षणीय ठरते.

मराठीने आत्तापर्यंत साधलेल्या प्रगतीचे अवाजवी अवमूल्यन केल्याचा आरोप माझ्यावर लावला जाणार नाही, अशी मला आशा आहे. परंतु, परक्याच्या दृष्टीकोनातून आपल्या सध्याच्या साहित्याकडे पाहणाऱ्या कोणालाही हे साहित्य बहुतांशाने अंधश्रद्धाळू वा बालिश वाटेल, यात काही शंका नाही. ही निंदा पुसून काढण्यासाठी अनेक शतके कळकळीचे प्रयत्न करावे लागतील. परंतु, वर्तमानकाळ अनेक अर्थानी आश्वासक आहे, आणि लवकरच मराठी आधुनिक भारतातील प्रगत भाषांमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावेल, अशी स्पष्ट शक्यताही दिसते आहे.”

न्या. महादेव गोविंद रानडे (देशी प्रकाशनसूचीमधील मराठी भागाबद्दल टिप्पणी)