Author

अब्दुल बिस्मिल्लाह | Abdul Bismillah

अलाहाबाद विद्यापीठातून हिंदी भाषेत एम. ए., डी. फिल. बनारसमधील एका विद्यालयात दहा वर्षं शिकविल्यानंतर शिक्षक आंदोलनात अटकही झाली.

'कदम' नावाचे पुरोगामी विचाराचे नियतकालिक सुरू केले बनारसमधून. 'आफ्रो-एशियाई लेखक संमेलना'त ट्युनिशिया देशात सहभागी.

रशिया यात्रा केली. सध्या जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठ, नवी दिल्ली येथे हिंदी विभागाचे प्राध्यापक.

Author's books

Dantkatha । दंतकथा

50.00

हिंदीतील प्रसिद्ध लेखक अब्दुल बिस्मिल्लाह यांची 1990 मध्ये प्रकाशित झालेली ‘दंतकथा’ या मूळ हिंदी कादंबरीचा मराठी अनुवाद लेखक भारत सासणे यांनी केला आहे. या कादंबरीत सामान्य जीवाला व्यापणाऱ्या अबोध आतंकाचे प्रतिकात्मक आणि वैश्विक चित्रण आहे. एक कोंबडा आत्मकथा सांगतो आहे. आज जिवंत असला तरी उद्या कोणाच्या ताटामध्ये जाऊन दंतकथा बनण्याच्या दडपणाखाली आहे. भीती मृत्यूची तशीच जगण्याचीदेखील आहे. कोंबड्याची ही कथा मानवी आणि सामान्य माणसाची कथा होऊन जाते.