Dickens and Trolop । डिकन्स आणि ट्रोलॉप
₹80.00डिकन्स आणि ट्रोलॉप (व्यक्तिचित्रे) – चार्ल्स डिकन्स व ॲन्थनी ट्रोलॉप या दोन ब्रिटीश कादंबरीकारांवर त्यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षांत लिहलेले दोन दीर्घ लेख.
गोविंद तळवलकर हे इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक होते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते. सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार, साक्षेपी संपादक म्हणून त्यांची ख्याती आहे.
१९४७ साली बी.ए. झाल्यानंतर त्यांनी शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक होते, तर महाराष्ट्र टाइम्सचे २७ वर्षे संपादक होते
टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन मॅगझिन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले. ते "Asian Age" साठी अमेरिकेतूनही लिहीत असत.
त्यांचे बरेचसे लेखन पुस्तकरूपातही प्रकाशित झाले आहे.
डिकन्स आणि ट्रोलॉप (व्यक्तिचित्रे) – चार्ल्स डिकन्स व ॲन्थनी ट्रोलॉप या दोन ब्रिटीश कादंबरीकारांवर त्यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षांत लिहलेले दोन दीर्घ लेख.
मधुघट (लेखसंग्रह) – शेक्सपिअरवरील पाच आणि टॉलस्टॉय , झिवागो, रवींद्रनाथ, सुभाषबाबू, जेन ऑस्टिन इत्यादींवरील आठ अशा एकूण १३ लेखांचा संग्रह.
गोविंदराव तळवळकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये ‘वाचता वाचता’ हा स्तंभ ‘वाचस्पती’ या टोपणनावाने लिहिला, तो नंतर प्रेस्टीज प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने १९७९ मध्ये आला होता. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधनाकडून, हार्डबाऊंडमध्ये.