Author

हेमंत गोखले | Hemant Gokhale

हेमंत लक्ष्मण गोखले हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत . 2009 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यापूर्वी ते मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम केले .

मुंबई विद्यापीठातून एम. ए., एल. एल. एम.
एल.एल.एम, परीक्षेत आंतरराष्ट्रीय कायदा आणि घटनात्मक कायदा हा विषय घेऊन, विद्यापीठात प्रथम क्रमांक.
महाविद्यालयीन जीवनात युवक क्रांती दलात सहभाग.
१९७१ साली बांगलादेश मुक्तिलढ्याच्या वेळेस निर्वासितांच्या
छावण्यांमध्ये काम. त्या वेळी साधना साप्ताहिकात दहा लेखांची मालिका.
मुंबई हायकोर्टात घटनात्मक कायदा, औद्योगिक कायदा आणि सार्वजनिक हिताच्या प्रकरणांमध्ये वकिली. जानेवारी १९९४ मध्ये मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक.
१९९४ ते १९९९ गुजरात हायकोर्टात आणि १९९९ ते २००७ मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून काम.
२००९ साली दक्षिण आफ्रिकेतील विद्यापीठामधील परिषदांमध्ये सहभाग.
२०१३ मध्ये इंग्लंड व अमेरिकेच्या सर्वोच न्यायालयांना भेट.
मार्च २०२० मध्ये ढाका येथे आयोजित केलेल्या कायदेविषयक उन्हाळी शिबिरामध्ये व्याख्यान.

Author's books

Viplavi Bangla Sonar Bangla | विप्लवी बांगला सोनार बांगला

160.00

मे 1971 मध्ये, वयाच्या विशीत असलेले कायद्याचे विद्यार्थी हेमंत गोखले बांगलादेश मुक्तिसंग्रामातील निर्वासितांना मदत करण्यासाठी गेले होते. त्यावर आधारित दहा भागांची लेखमाला त्यांनी जून ते सप्टेंबर 1971 मध्ये साधना साप्ताहिकात लिहिली होती. त्यानंतर जवळपास पन्नास वर्षांनी म्हणजे मार्च 2020 मध्ये, वयाच्या सत्तरीत असलेले सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले व्याख्यानाच्या निमित्ताने बांगलादेशला गेले होते. या भेटीवर आधारित दहा भागांची लेखमाला त्यांनी जानेवारी ते एप्रिल 2021 मध्ये साधना साप्ताहिकात लिहिली होती. त्या दोन्ही लेखमालांचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचा पूर्वार्ध विप्लवी बांगला म्हणजे संघर्षशील बांगलादेश आणि उत्तरार्ध सोनार बांगला म्हणजे विकसनशील बांगलादेश. इ.स. 2020-21 हा काळ म्हणजे शेख मुजिबुर रहेमान यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष, म्हणून या पुस्तकाला विशेष औचित्य आहे.

हे लिखाण म्हटले तर आठवणींचे आहे, म्हटले तर हे प्रवासवर्णन आहे, आणि यात काही मुलाखतीही आहेत. पण माझ्या दृष्टीने हे पुस्तक म्हणजे बांगलादेशाच्या निर्मितीच्या काळातील व त्यानंतरच्या मोठ्या स्थित्यंतराचा आलेख आहे.

– माधव गोडबोले (निवृत्त केंद्रीय गृह व न्याय सचिव)