Author

न्या. म. गो. रानडे | M. G. Ranade

महादेव गोविंद रानडे (जन्म : 18 जानेवारी 1842; मृत्यू : 16 जानेवारी 1901)

न्या. रानडे हे महाराष्ट्रातील समाजसुधारक, तसेच अर्थशास्त्रज्ञ व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. इ.स. 1878 मध्ये पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. 1885 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले.

न्या.रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. स्त्रियांचे शिक्षण, मुलांबरोबर सहशिक्षण, विधवा विवाह, केशवपनाला बंदी, मुला-मुलींच्या विवाहासाठी वयोमर्यादा, जातिनिर्मूलन, अस्पृश्यता निवारण या प्रकारच्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी आयुष्य वेचले. स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे (आर्थिकदृष्ट्या) असा त्यांचा प्रयत्न होता. रानडे यांच्या या सामाजिक सुधारणाविषयक कार्याला सनातन्यांकडून कडाडून विरोध होत राहिला. पण त्यांचे कार्य चालूच राहिले.

शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले.

Author's books

Saleनवी पुस्तके

न्या. म.गो.रानडे यांचे तीन ग्रंथ | Nya. M. G. Ranade Yanche Tin Granth

1,200.00

1842 ते 1901 असे 60 वर्षांचे आयुष्य न्यायमूर्ती रानडे यांच्या वाट्याला आले. त्यांच्या भाषणांचे व निबंधाचे संग्रह असलेले

1. Essays on Indian Economics.
2. Religious and Social Reforms.
3. Miscellaneous Writings.

हे तीन ग्रंथ 1896 ते 1906 या काळात प्रकाशित झाले होते.

मात्र या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद मराठीत यापूर्वी कधीच झाले नाहीत.
आता या तिन्हींचे अनुवाद अनुक्रमे

1. भारतीय अर्थकारणावरील निबंध.
2. धार्मिक व सामाजिक सुधारणा.
3. संकीर्ण निबंध.

या तीन शीर्षकांखाली साधना प्रकाशनाकडून आले आहेत. अवधूत डोंगरे यांनी या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद केले आहेत.
या तीन अनुवादित ग्रंथांना अनुक्रमे नीरज हातेकर, अरविंद गणाचारी व अभय टिळक यांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत.
या लेखनाचे त्या काळातील महत्त्व आणि आजच्या काळातील उपयुक्तता यांचा वेध घेण्याचा प्रयत्न तिन्ही प्रस्तावनाकारांनी केला आहे