Author

मुकुंद टाकसाळे | Mukund Taksale

मुकुंद टाकसाळे हे विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. टप्पू सुलतान या टोपणनावानेही त्यांनी काही लिखाण केले आहे.
त्यांनी साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींवर ललित मासिकात आनंद पुणेकर या टोपणनावाने एक सदर चालविले होते. "ठणठणपाळा'हून वेगळी शैली असलेल्या या सदराला वाचकांनी पसंत केले होते.

Author's books

मुका म्हणे… | Muka Mhane…

160.00

मुकुंद टाकसाळे यांनी ‘वाङ्मयवृत्त’ या मासिकासाठी ‘तिरपागड’ आणि ‘साधना’ साप्ताहिकासाठी ‘मुका म्हणे…’ या नावाने सदरे लिहिली, त्यांतील निवडक ललित लेखांचा हा संग्रह आहे. वर्तमानातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना-घडामोडींच्या निमित्ताने केलेले हे लेखन आहे.