Author

विनोद शिरसाठ | Vinod Shirsath

विनोद शिरसाठ हे एक मराठी लेखक आहेत. मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असून ते २४ ऑगस्ट २०१३ पासून साधना साप्ताहिकाचे मुख्य संपादक आहेत. तसेच ते साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचेही संपादक आहेत.

Author's books

Nivadak Balkumar Sadhana | निवडक बालकुमार साधना

280.00

साधनाने हीरकमहोत्सवी म्हणजे साठाव्या वर्षात बालकुमारांसाठी स्वतंत्र दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आणि गेली दहा वर्षे त्यात कमालीचे सातत्य ठेवले आहे. या दहा दिवाळी अंकांमध्ये ७३ गोष्टी/लेख प्रसिद्ध झाले, त्यातील निवडक ३६ लेखांचा/गोष्टींचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.

     

Samyak Sakaratmak | सम्यक सकारात्मक

240.00
सम्यक सकारात्मक (लेखसंग्रह) – २००६ ते २०१३ या आठ वर्षांत साधनाचा युवा संपादक व कार्यकारी संपादक म्हणून काम करताना लिहलेल्या संपादकीय लेखनातील निवडक ४५ लेख.

     

Thet Sabhagruhatun | थेट सभागृहातून

240.00
थेट सभागृहातून (भाषणसंग्रह) – मनमोहन सिंग, चिदंबरम, ओबामा, अंग सान सू की ते गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर, कुमार केतकर अशा २० नामवंतांनी अत्यंत महत्वाच्या प्रसंगी केलेली व गाजलेली भाषणे.

     

Third Angle | थर्ड अँगल

80.00
थर्ड अँगल (भाष्यचित्रे) – प्रॅक्टिकल क्लबमध्ये एक थिअरॉटिकल मित्र नियमितपणे येतो आणि प्रॅक्टिकल मित्रांसमोर भाषणे देऊन जातो, त्यातील निवडक १२ भाषणे.

     

Vidnyan Ani Samaj | विज्ञान आणि समाज

100.00

विज्ञान आणि समाज (लेखसंग्रह) – डॉ. नरेंद्र दाभोलकर, सुबोध जावडेकर, मयंक वाहिया, विवेक सावंत व जॉर्ज ऑरवेल या पाच मान्यवरांचे विज्ञान, वैज्ञानिक दृष्टीकोन, भ्रामक विज्ञान, प्राचीन भारतातील विज्ञान, मानवी बुद्धिमत्ता या विषयांचा वेध घेणारे लेख.

     

Zapatlepan Te Janatepan | झपाटलेपण ते जाणतेपण

200.00
झपाटलेपण ते जाणतेपण (आत्मनिवेदने) – प्रतीक्षा लोणकर, राजन गवस, अतुल कुलकर्णी, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अभिजित वैद्य, संजय भास्कर जोशी, सुभाष वारे इत्यादी १२ नामवंतांचे स्वतःचा जीवनप्रवास सांगणारे लेख.

     

1 2