Author

विनोद शिरसाठ | Vinod Shirsath

विनोद शिरसाठ हे एक मराठी लेखक आहेत. मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असून ते 24 ऑगस्ट 2013 पासून साधना साप्ताहिकाचे मुख्य संपादक आहेत. तसेच ते साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचेही संपादक आहेत.

Author's books

Saleनवी पुस्तके

मला प्रभावित करून गेलेले पुस्तक | Mala Prabhavit Karun Gelele Pustak

160.00

या पुस्तकातून अशा निष्कर्षाप्रत सहज येता येईल की, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळी पुस्तके प्रभाव टाकून जाऊ शकतात. यातून ‘वाचनाचे’ व अधिक चांगल्या वाचनाचे महत्त्व अधोरेखित होते. शिवाय, अभिजात किंवा संशोधनपर किंवा अस्सल जीवनानुभव सांगणारी किंवा अद्भुत अनोखे विश्व दाखवणारी किंवा कल्पकता प्रतिभा यांना बढावा देणारी पुस्तके, प्रभाव टाकून जाण्याची क्षमता जास्त बाळगून असतात. म्हणजे तशी पुस्तके वाचण्याची सवय असेल तर आपला सभोवताल समजून घेण्यासाठी ती विशेष उपयुक्त ठरतात!

ही गुणवैशिष्ट्ये तरुणाईच्या संदर्भात अधिक महत्त्वाची ठरू शकतात. कारण त्यांचे मानस अशाच मार्गदर्शकांच्या किंवा बियाणांच्या शोधात असते. अर्थातच हे एक सर्वपरिचित साधे सत्य आहे, पण प्रयोगातून पुढे आलेले! म्हणून याचे महत्त्व अधिक!

सारांश, हे पुस्तक वाचनाची सवय असलेल्या, बन्यापैकी राजकीय-सामाजिक भान आलेल्या व ‘स्व’ची जाणीव झालेल्या तरुणाईला अंधुक का होईना दिशा दाखवणारे वाटू शकेल.

 

         

लाटा लहरी | Lata Lahari

80.00
लाटा लहरी (संवादचित्रे) – 25 वर्षांच्या आतबाहेरचे वय असलेल्या सहा तरुण मित्रांचे विविध विषयांच्या निमित्ताने झडलेले मार्मिक वादसंवाद.

     

विज्ञान आणि समाज | Vidnyan Ani Samaj

100.00

विज्ञान आणि समाज (लेखसंग्रह) – डॉ. नरेंद्र दाभोलकर, सुबोध जावडेकर, मयंक वाहिया, विवेक सावंत व जॉर्ज ऑरवेल या पाच मान्यवरांचे विज्ञान, वैज्ञानिक दृष्टीकोन, भ्रामक विज्ञान, प्राचीन भारतातील विज्ञान, मानवी बुद्धिमत्ता या विषयांचा वेध घेणारे लेख.

     

1 2 3