Sale

100.00

सोनार बांगला | Sonar Bangala

1971 ला भारत पाकिस्तान युद्ध झाले, त्याला बांगलादेश मुक्तिसंग्रमाची पार्श्वभूमी होती. ते युद्ध संपल्यावर ग. प्र. प्रधान यांनी बांगला भूमीत जाऊन तेथील सैनिक व नागरिक यांच्याशी संवाद करून जो रिपोर्ताज लिहिला त्याचे पुस्तक म्हणजे सोनार बांगला!

             

Share

Meet The Author

1971 च्या 3 डिसेंबरला भारत-पाक युद्धाला सुरुवात झाली. युद्धकाळात सर्वसामान्य माणसांना नीट भेटता येत नाही. म्हणून युद्ध संपल्यावर 25 डिसेंबरपासून 11 जानेवारीपर्यंत बांगला देशात आम्ही अनेक ठिकाणी फिरलो; अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. जे ऐकले व जे पाहिले त्यातून तेथे झालेल्या कत्तलींची व अत्याचारांची भीषणता उमगली. भारतीय जवानांचा पराक्रम, मुक्तिवाहिनीतील सैनिकांचे शौर्य व समर्पण यांच्या स्फूर्तिदायक कथा ऐकल्या. अनेक विचारवंतांच्या व भूमिगत कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. या सर्वांतून जीवनातील उदात्तता व भव्यता, क्रूरता व निर्घृणता, मृत्यूची कृष्णछाया आणि नवजीवनाचा प्रकाश यांचे अपूर्व दर्शन मला घडले! त्याच काळात बांगला देशातील विचारवंतांच्या जगात प्रवेश मिळाला, आणि त्यांच्याबरोबर केलेल्या चर्चेतून माझ्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळाली. – ग. प्र. प्रधान

 

Weight 0.15 kg
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Size

M, S

Pages

104

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सोनार बांगला | Sonar Bangala”

Your email address will not be published.