गांधीविचाराची क्रांतिकारी परिवर्तनाशी नाळ जोडली गेली नाही. गांधीजींना राजश्रयी बनवण्यात गांधीवाद्यांनी तर भांडवलदारांचे हस्तक म्हणवण्यात डाव्यांनी धन्यता मानली. काही आंबेडकरवादी प्रवाहांनी गांधींना जातिव्यवस्था-समर्थक/ मनुवादी म्हणत भांडवलशाही व हिंदुत्ववाद यांच्याऐवजी गांधीवादालाच ‘शत्रु क्रमांक एक’ मानले. परिणामी, गांधी व त्यांच्या विचारांचा सोयीस्कर वापर सुरू झाला. त्या प्रक्रियेत गांधींच्या विचारातील अनेक महत्त्वाचे पैलू अलक्षित राहिले. त्यातील काही पैलूंचा आजच्या दृष्टिकोनातून केलेला साधक-बाधक विचार या पुस्तकात आहे, गांधींकडे पाहण्याचा निराळा दृष्टिकोन यातून मिळतो
Lokshahicha Kaivari | लोकशाहीचा कैवारी
₹200.00लोकशाहीचा कैवारी (चरित्र) – उत्कृष्ठ संसदपटू व समाजवादी नेते अशी ओळख असलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांचे राजकीय, सामाजिक जीवन त्यांच्या मित्राने रेखाटले आहे.
Reviews
There are no reviews yet.