नोकरशाहीत काम करणारे लोक परग्रहावरून उतरत नाहीत; समाजातून तयार झालेली ती हाडामांसाची माणसेच असतात. पण तरीही सामान्य जनतेला नोकरशाहीविषयी आपुलकी नाही आणि नोकरशाहीला सामान्य जनतेविषयी आस्था नाही. हे असे का बरे होत असावे ? नोकरशाही म्हणजे केवळ भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, अकार्यक्षमता एवढेच की काय ? आणि समाजाचेही काही चुकत नाही असे थोडेच आहे? मग काय केले तर एकविसाव्या शतकातल्या भारताच्या आशा-आकांक्षा साकार करून दाखविणारे प्रशासन तयार होईल ? दारिद्र्य, विषमता, विकासातला असमतोल दूर करता येईल? मंत्रालय, सचिवालय, विदेशातील भारतीय दूतावास येथे नेमके चालते तरी काय?
देशात आणि जगभरातील अनेक देशांच्या राजधान्यांत, भारत सरकारच्या सल्लागारांपासून प्रभारी राजदूतांपर्यंत अनेक भूमिका प्रभावीपणे पार पाडत असतानाही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून चिंतन, मनन व लेखन करणारे ‘विश्वनागरिक’ ज्ञानेश्वर मुळे, आपल्या सरकारी कोशातून बाहेर पडून वाचकांशी हळुवार संवाद साधत आहेत.
Reviews
There are no reviews yet.