Saleनवी पुस्तके

40.00

Sadhana Balkumar Diwali 2022 | साधना बालकुमार दिवाळी 2022

आसामी, अरेबियन, कुर्दिश, पर्शियन, कोरियन आणि इंग्रजी या सहा भाषांमधील सहा चित्रपटांवरील गोष्टीरूप लेख.
या सर्व चित्रपटांच्या केंद्रस्थानी मुले आणि त्यांचे विश्व आहे, पण रूढ अर्थाने हे बालचित्रपट नाहीत.

            

Out of stock

Share

75 वर्षांची परंपरा असलेल्या साधना साप्ताहिकाच्या वतीने मागील 15 वर्षांपासून दरवर्षी बालकुमार दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. हा अंक जरी 10 ते 15 वर्षे वयोगट समोर ठेवून काढला जात असला तरी पालक, शिक्षक आणि वाचनाची सवय असलेल्या कोणालाही आवडतो.

गेली काही वर्षे हा अंक विशिष्ट थीम घेऊन काढला जातो. या वर्षीच्या अंकाची थीम आहे सहा देशांतील सहा चित्रपट.. हे चित्रपट मुलांना पाहायला आवडतील व समजतील असे आहेत. या चित्रपटांच्या केंद्रस्थानी बाल व कुमार वयोगटातील मुले-मुली आहेत, पण हे बालचित्रपट नाहीत. त्यातून त्या मुला-मुलींचे भावविश्व प्रकट होते आणि त्यांच्या दृष्टीतून सभोवतालाचे दर्शनही घडते. हे सहा लेख वाचणाऱ्या लहान-मोठ्यांच्या मनात मूळ चित्रपट पाहण्याची इच्छा तीव्र होईल, एवढेच नाही तर आपल्या सभोवतालाकडे अधिक सजगपणे व संवेदनशीलपणे पाहण्याची दृष्टी मिळेल.

अनुक्रमणिका

हिटलरचा फॅन असलेला जोजो
सिनेमा : जोजो रॅबिट
इंग्रजी, अमेरिका
लेखन : मृद्‌गंधा दीक्षित
वजदा जिंकली की हरली?
सिनेमा : वजदा
अरेबिक, सौदी अरेबिया
लेखन : दिपाली अवकाळे
डाना, झाना आणि सुपरमॅन
सिनेमा : बेकस
कुर्दिश, इराक
लेखन : सुहास पाटील
अली आणि झेहरा यांचे शूज
सिनेमा : चिल्ड्रेन ऑफ हेवन
पर्शियन, इराण
लेखन : समीर शेख
सांग वू आणि त्याची आजी
सिनेमा : द वे होम
कोरियन, दक्षिण कोरिया
लेखन : हिनाकौसर खान
गिटारचा ध्यास घेणारी धुनु
सिनेमा : व्हिलेज रॉकस्टार्स
आसामी, भारत
लेखन : मृद्‌गंधा दीक्षित

Size

M, S

Pages

44

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sadhana Balkumar Diwali 2022 | साधना बालकुमार दिवाळी 2022”

Your email address will not be published.