Author

मधु दंडवते | Madhu Dandavate

Author's books

Saleनवी पुस्तके

Jivanashi Sanvad | जीवनाशी संवाद

240.00

२१ जानेवारी १९२४ ते १२ नोव्हेंबर २००५ असे ८१ वर्षांचे आयुष्य लाभलेले मधु दंडवते यांनी विद्यार्थीदशेत असतानाच १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी पुढील दोन दशकांत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला. नंतर १९७५ ते ७७ या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.

१९७१ ते ९१ या काळात कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा ते निवडून आले आणि उत्तम संसदपटू म्हणून त्यांची ख्याती झाली. त्याच दरम्यान त्यांनी मोरारजी देसाई मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री म्हणून तर व्ही.पी. सिंग मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना, म्हणजे १९९६ ते ९८ या काळात ते केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीत मिळून डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ‘डायलॉग विथ लाइफ’ या आत्मकथनात्मक व कार्यकथनात्मक म्हणता येईल अशा इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.

 

   

Saleनवी पुस्तके

Pariwartnache Don Paik | परिवर्तनाचे दोन पाईक

60.00

आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.

 

     

Saleनवी पुस्तके

Vedh Antarvedh | वेध अंतर्वेध

240.00
प्रतिभावान लेखकांची नानाविध रंगांची उधळण करणारी आणि सुगंध दरवळणारी तजेलदार साहित्यसुमने माझ्या परडीत नाहीत. या लेखसंग्रहात आहेत त्या फक्त सामाजिक, राजकीय, आर्थिक, संसदीय, तत्त्वज्ञानविषयक, भारतीय घटनासंबंधित आणि वैज्ञानिक समस्यांची मीमांसा करणाऱ्या लेखांच्या शुष्क समिधा ! या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात राजकारण, समाजकारण, अर्थशास्त्र, विज्ञानशास्त्र, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांतील परिवर्तनाच्या आणि उपक्रमशीलतेच्या प्रक्रियेत मोठा सहभाग असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा वेध घेतलेला आढळेल, तर दुसऱ्या भागात विविध वैचारिक समस्यांबाबतच्या माझ्या अंतर्वेधाचे प्रतिबिंब उमटलेले दिसेल. गेली अनेक वर्षे मी केलेले लिखाण म्हणजे निरनिराळ्या क्षेत्रांत निर्माण झालेल्या नव्या नव्या वैचारिक आव्हानांना दिलेला प्रतिसाद आहे. या वास्तवाचा प्रत्यय वाचकांना प्रस्तुत लेखसंग्रहात येईल.