सामाजिक

Saleनवी पुस्तके

25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य | 25 Varshantil Dalitanche Swatantrya

160.00

भारत स्वतंत्र झाला त्या घटनेला 15 ऑगस्ट 1972 रोजी 25 वर्षे पूर्ण होणार होती, म्हणजे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला जाणार होता. त्या पार्श्वभूमीवर साधना साप्ताहिकाने ’25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ या विषयावर विशेषांक काढला. त्या अंकाचे संपादन केले होते, त्यावेळी केवळ 27 वर्षे वय असलेले अनिल अवचट यांनी. त्या अंकात अकरा लेख, एक कथा, चार कविता आणि सहा अनुभव असा ऐवज होता. तो अंक उत्तमच होता, मात्र त्यातील राजा ढाले यांच्या लेखातील तीन-चार वाक्यांमुळे वादळ निर्माण झाले. त्या अंकावर आणि मुख्यतः त्या लेखावर अनेक लहान थोरांच्या मिळून 57 प्रतिक्रिया आल्या, त्यानंतरच्या सलग चार साधना अंकांत त्या प्रसिद्ध झाल्या.

तो संपूर्ण अंक आणि त्या निमित्ताने झडलेले वादसंवाद, या पुस्तकातून सादर करीत आहोत.

     

 

Saleनवी पुस्तके

Aadhar Nasleli Mansa | आधार नसलेली माणसं

160.00

वंचितांबरोबर काम करण्यामुळे माझं सारं जीवनच बदलून गेलं. जीवनाकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. या जनसमुदायांच्या जीवनात डोकावून बघण्याची संधी मला मिळाली आणि ध्येयहीन जीवनाला निश्चित ध्येय लाभलं. ध्येय नव्हतं असं नाही म्हणत, पण ध्येय सतत बदलत होतं. लहान होते, तेव्हा खेळात पुढे येण्याची आतुरता होती. पुढे सायन्स घेऊन इंजिनीयर व्हायचं होतं आणि हे सारं एका बाजूला ठेवून शेवटी सनदी अधिकारी होण्याचा निर्धार केला. अहमदाबादलासुद्धा त्यासाठीच आले. परंतु अहमदाबादला आल्यानंतर जीवन नव्याच मार्गावर चालू लागलं. पत्रकारिता शिकता शिकताच देशातील गरीब-शोषितांची दुःखं खूप जवळून बघितली, समजून घेतली आणि त्यांच्याबरोबर राहिलेदेखील. मी ऊस कामगारांबरोबर दीड महिना राहिले. या दीड महिन्यानं मला मुळापासून हलवलं आणि बदलून टाकलं. माझा पुनर्जन्म झाला.

 

Angry Young Secularist | अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट

125.00

अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट (लेख संग्रह) – हमीद दलवाई यांची एक मार्मिक मुलाखत, त्यांनी वसंत नगरकरांना लिहलेली १३ पत्रे आणि दलवाईंवर इतर १३ मान्यवरांनी लिहलेले लेख आदींचा समावेश या पुस्तकात आहे.

महाराष्ट्राच्या व भारताच्या संदर्भात, १९७० चे दशक संतप्त तरुणाईचे होते. त्या दशकात समतेच्या बाजूने व शोषणाच्या विरोधात अनेक चळवळी झाल्या, त्यात तरुणाईच आघाडीवर होती. १९६५ ते ७५ या काळात मुस्लीम समाजातील सुधारणांसाठी महाराष्ट्रातील एक तरुण झंझावतासारखा कार्यरत होता, त्याचे नाव हमीद दलवाई. दिलीप चित्रे या मित्राने त्याचे वर्णन, ‘अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट’ असे केले होते. त्याच्या ध्येयवादाचा व दूरदृष्टीचा ट्रेलर पहायचा असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवे.
There are 13 articles on Secular reformer Hamid Dalwai, written by his family members, friends , and dignitaries in the field of social work . It includes Husain Dalwai, A. B. Shaha, Dilip Chitre, Vijay Tendulkar, Bhau Padhye, Govind Talwalkar etc. We can understand the personality and thoughts of Dalwai

     

Bijapur Diary | बिजापूर डायरी

200.00

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्हात शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करताना डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी तिथल्या आदिवासी जनजीवन, सकारात्मक बदलाचे जे अनुभव घेतले त्याचे हे शब्दचित्रण.

           

Saleनवी पुस्तके

Dev Tethechi Janava | देव तेथेचि जाणावा

240.00

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने १९९४ पासून मराठी साहित्य पुरस्कार, तर १९९६ पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार दर वर्षी दिले जातात. या पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी स्मरणिका किंवा विशेषांक दर वर्षी प्रसिद्ध होत आले आहेत. मात्र २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात दर वर्षी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखती असलेले अंक साधना साप्ताहिकाने प्रकाशित केले. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य ही चतुःसूत्री समोर ठेवून या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

पाच वर्षांत समाजकार्य विभागात दर वर्षी पाच पुरस्कार दिले गेले. त्यामध्ये समाजकार्य जीवनगौरव, कार्यकर्ता पुरस्कार प्रबोधनासाठी, कार्यकर्ता पुरस्कार संघर्षासाठी, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार आणि विशेष कार्य पुरस्कार किंवा युवा पुरस्कार अशी वर्गवारी केलेली होती. त्या पाच वर्षांतील समाजकार्य पुरस्कारप्राप्त सर्व म्हणजे एकूण २५ व्यक्तींच्या मुलाखतीचे संकलन असलेले हे पुस्तक आहे.

 

   

Saleनवी पुस्तके

Dharmaresha Olandatana | धर्मरेषा ओलांडताना

240.00
या पुस्तकात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध अशा आंतरधर्मीय विवाहितांच्या १५ मुलाखती आहेत. या मुलाखतीमधून आंतरधर्मीय विवाहितांचे सहजीवन समजून घेण्याची धडपड आहे. या जोडप्यांचे जरी प्रेमविवाह असले तरी व्यावहारिक पातळीवर परस्परांशी, कुटुंबियांशी, सभोवतालाशी त्यांनी कशापद्धतीनं जुळवून घेतलं, त्यांच्या एकमेकांविषयीच्या, स्वतःच्या आणि परस्परांच्या धर्माविषयीच्या समजूती काय होत्या, त्या मोडल्या अगर त्यात नवी भर पडली, या तऱ्हेच्या सहजीवनात एकमेकांविषयीच्या जाणिवा किती समृद्ध वा आकुंचित होतात इत्यादी बाबी जाणून घेतल्या आहेत. आपल्या नात्याकडे निरपेक्ष आणि खुलेपणाने पाहू शकणाऱ्या या जोडप्यांकडून मिळणारं संचित अमूल्य आहे. माणूसपणाच्या जाणिवा अधोरेखित करणारं आहे.

 

   

 

1 2 7