प्रतिभावंत वास्तुशिल्पी लॉरी बेकर यांचे जीवन म्हणजे वास्तुकलेतील एकहाती अबोल क्रांती होती. निसर्गाशी तादात्म्य पावणाऱ्या हजारो अल्पखर्ची वास्तूंमधून ‘वास्तुकला म्हणजे गोठवलेले संगीत’ या उक्तीची प्रचीती येते. तसेच बेकर यांना अभिप्रेत तत्त्वज्ञान आणि जीवनशैली उमजून येते. ‘पंचक्रोशीतील सामग्रीतून आपल्या गरजा भागवल्या पाहिजेत.’ हा गांधीजींचा सल्ला त्यांनी प्रमाण मानला होता. हरित इमारत, पर्यावरणपूरक वास्तू, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास, नगररचना वास्तुकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडत असेल तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, बुद्धी व भावना, निसर्ग व माणूस, आशय व घाट यांत अद्वैत साधून आधुनिकता व सुसंस्कृतता रुजवणारी बेकर यांची ही सर्जनशील यात्रा 59 वर्षे अथक होती.
दृष्टी आरोग्यक्रांतीची | Drushti Aarogyakrantichi
₹240.00ग्रामीण भागातील एक विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी काय करता येईल, यावर सक्रिय होतो. त्या दृष्टीने विविध उपक्रम आखतो. त्यातूनच पुढे ‘भारतवैद्य’, ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’, ‘महिला बचतगट योजना’, ‘एकल महिलांचे सक्षमीकरण’ असे उपक्रम साकारतात. त्या स्थानिक ‘भारतवैद्य’ उपक्रमातूनच पुढे राष्ट्रीय पातळीवर ‘आशा’ साकारते. ‘व्यवस्थेसाठी माणूस नाही, तर माणसासाठी व्यवस्था’ हे ब्रीद कठोरपणे पाळत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. शशिकांत अहंकारी आजन्म प्रयत्नशील राहिले. ग्रामीण आरोग्यात सुधारणा घडवण्यासाठी नवी दृष्टी देणारा त्यांचा जीवन प्रवास हृद्य तर आहेच, पण अनुकरणीयही आहे.
वीणा गवाणकर
Reviews
There are no reviews yet.