सामूहिक शहाणिवेचा ऱ्हास होत असला तरी समाजाला त्याची गंधवार्ता असू नये, असा हा काळ आहे. विचार-सामंजस्य यांना थारा नाही, मानसिक-भावनिक समतोलाचा ठहराव नाही, अशा एकाच दिशेने स्वमग्न झुंडीच्या झुंडी वाट तुडवीत जात आहेत. प्रत्येक काळात समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी विचार व कृती देणाऱ्या विवेकी व्यक्ती निष्ठेने कार्यरत असतात. त्यांच्या विचारांतून अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला नवी उमेद मिळू शकते. अट एकच… ‘त्यांना मनापासून शांतपणे ऐकणे!’ आधी ‘विवेकीयांची संगती’, ‘बोलिले जे’ आणि आता ऐकता दाट’ ह्या त्रयींमधून अतुल देऊळगावकर यांनी मूल्यांचा आग्रह धरणारी विशाल दृष्टी सादर केली आहे. तुकाराम शृंगारे, मधु लिमये, डॉ. श्रीराम लागू, वीणा गवाणकर, विजयअण्णा बोराडे, नंदा खरे, डॉ. शुभांगी व डॉ. शशिकांत अहंकारी ह्या आपापल्या क्षेत्रात ठसा उमटविलेल्या दिग्गजांचं ज्ञानसंचित ह्या पुस्तकातून खुलं केलं आहे.
दृष्टी आरोग्यक्रांतीची | Drushti Aarogyakrantichi
₹240.00ग्रामीण भागातील एक विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी काय करता येईल, यावर सक्रिय होतो. त्या दृष्टीने विविध उपक्रम आखतो. त्यातूनच पुढे ‘भारतवैद्य’, ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’, ‘महिला बचतगट योजना’, ‘एकल महिलांचे सक्षमीकरण’ असे उपक्रम साकारतात. त्या स्थानिक ‘भारतवैद्य’ उपक्रमातूनच पुढे राष्ट्रीय पातळीवर ‘आशा’ साकारते. ‘व्यवस्थेसाठी माणूस नाही, तर माणसासाठी व्यवस्था’ हे ब्रीद कठोरपणे पाळत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. शशिकांत अहंकारी आजन्म प्रयत्नशील राहिले. ग्रामीण आरोग्यात सुधारणा घडवण्यासाठी नवी दृष्टी देणारा त्यांचा जीवन प्रवास हृद्य तर आहेच, पण अनुकरणीयही आहे.
वीणा गवाणकर
Reviews
There are no reviews yet.