रूढ अर्थाने या संहितेचा ढाचा चरित्राचा नाही. आयुष्यातील मैलाचा दगड मानावा अशा घटनांनुरूप प्रकरणे पाडून चरित्रनायकाच्या आयुष्याचा पट कालक्रमणेनुसार उलगडून दाखवण्याचा चरित्रलेखनाचा फॉर्म येथे वापरलेला नाही.
साने गुरुजींच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील घटनांचा परस्परांशी मेळ घालत, त्या घटनांना एकमेकांच्या प्रकाशात न्याहाळत साने गुरुजींना आणि त्यांच्या भूमिकांना समजून घेण्याचा आणि त्याद्वारे साने गुरुजींच्या वैचारिक चारित्र्याचा पट उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. साने गुरुजींच्या आयुष्यातील अनेक घटनांचे त्यांच्या अनेक चरित्रलेखकांनी ‘गुरुजी संवेदनशील-भावनाप्रधान होते, भोळे होते, हळवे होते’ या प्रकारचे एकच स्पष्टीकरण वारंवार दिले आहे. त्याच्या पलीकडे जाऊन गुरुजींना समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
Reviews
There are no reviews yet.