1933 मध्ये नाशिकच्या तुरुंगात असताना साने गुरुजींनी पाच दिवसांत ‘श्यामची आई’ हे दोनशे पानांचे पुस्तक लिहिले, 1953 मध्ये त्यावर आधारित आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमाही आला. ते पुस्तक मराठी साहित्यविश्वात आणि तो सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत माईलस्टोन मानले जातात. मागील पाऊणशे वर्षांत महाराष्ट्रातील घराघरांत ‘श्यामची आई’ पोहोचली. ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहून झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे तब्बल 88 वर्षांत त्याबाबत खूप काही घडले आहे. त्या सर्वांची एकत्रित माहिती कुठेही उपलब्ध नाही, पण ती असायला हवी. त्या दृष्टीने केलेला हा एक प्रयत्न आहे. या माहितीचा उपयोग करून विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यासाठी अनेकांना बळ मिळेल. आणि या माहितीत भर टाकून नवी संकलने प्रकाशित करण्याची प्रेरणाही काहींना मिळेल. विद्यार्थी, शिक्षक, पालक, अभ्यासक, कार्यकर्ते आणि संस्था व संघटना चालक यांना हे संकलन उपयुक्त वाटेल.
आधार नसलेली माणसं | Aadhar Nasleli Mansa
₹160.00वंचितांबरोबर काम करण्यामुळे माझं सारं जीवनच बदलून गेलं. जीवनाकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. या जनसमुदायांच्या जीवनात डोकावून बघण्याची संधी मला मिळाली आणि ध्येयहीन जीवनाला निश्चित ध्येय लाभलं. ध्येय नव्हतं असं नाही म्हणत, पण ध्येय सतत बदलत होतं. लहान होते, तेव्हा खेळात पुढे येण्याची आतुरता होती. पुढे सायन्स घेऊन इंजिनीयर व्हायचं होतं आणि हे सारं एका बाजूला ठेवून शेवटी सनदी अधिकारी होण्याचा निर्धार केला. अहमदाबादलासुद्धा त्यासाठीच आले. परंतु अहमदाबादला आल्यानंतर जीवन नव्याच मार्गावर चालू लागलं. पत्रकारिता शिकता शिकताच देशातील गरीब-शोषितांची दुःखं खूप जवळून बघितली, समजून घेतली आणि त्यांच्याबरोबर राहिलेदेखील. मी ऊस कामगारांबरोबर दीड महिना राहिले. या दीड महिन्यानं मला मुळापासून हलवलं आणि बदलून टाकलं. माझा पुनर्जन्म झाला.
Reviews
There are no reviews yet.