Author

संजीवनी खेर | Sanjeevani Kher

पत्रकार, लेखिका, लघुपटकार, टीव्ही कार्यक्रम संचालिका, साप्ताहिक लोकप्रभा (इंडियन एक्सप्रेस समूह) ची माजी सहसंपादक, सामाजिक घडामोडी, संस्कृती, चित्रपट, स्त्रियांचे प्रश्नांवर सदर लेखन

Author's books

Gandhinche Garud | गांधींचे गारुड

140.00
सोंजा श्लेशिंग, नील्ला नागिनी, मॅडेलिन स्लेड, म्युरिअल लेस्टर, कॅथरिन मेयो, मागरिट स्पिगेल, पॅट्रेशिया केंडल, मागरिट बर्के, ॲन मेरी पीटरसन, मेरी चेस्ली, अन्टोनेट मिरबेल, एलन होरूप अशा अनेक जणी. त्यांतील काही महायुद्धात होरपळलेल्या, काही आध्यात्मिकतेच्या प्रेमाने आलेल्या काही शाकाहार, ब्रह्मचर्य, त्याग, खादी, अस्पृश्योद्धार, प्रार्थनेचे सामर्थ्य अशा अनेक वास्तव आणि गूढ संकल्पनांनी भारताबद्दलच्या ओढीने इथे खेचत आल्या. काही टिकल्या, काहींना इथले हवामान झेपले नाही नि परत गेल्या. पण स्वदेशात त्यांनी गांधीविचाराने अनेक संस्था सुरू केल्या. गांधींचा त्यांच्यापैकी बहुतेकींशी पत्रव्यवहार सुरू राहिला. अनेकींनी आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली. त्यामुळे गांधींचा काळ नि त्यांच्या विचारांचा ठसा देशी-विदेशी स्त्रियांवर कसा उमटला, हे कळायला मदत झाली.