1965 च्या 2 ऑक्टोबरपासून तीन आठवडे मी भारत-पाक युद्ध आघाडीवर वार्ताहर म्हणून गेलो होतो. त्यावेळी पंजाब व जम्मू-काश्मीरमध्ये आणि युद्ध आघाडीवरील विभागात फिरताना जे पहिले, ते अनुभव लिहून ठेवावे असे ठरवले. त्या काळाचा आमच्या सर्वांच्या मनावर जो संस्कार घडला, तो कधी पुसला जाणार नाही. त्यामुळे हे निवेदन प्रसिद्ध करावेसे वाटले. शिवाय हेही नम्रपणाने सांगावेसे वाटते की, मी केवळ वृत्तपत्रीय निवेदन लिहिलेले नाही. साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे तत्कालिकाचे अवलोकन करताना मानवी मनाच्या अक्षय भावना दर्शवणारे क्षण टिपण्याचा प्रयत्न येथे केला आहे. अनेक व्यक्ती, दृश्ये, घटना आणि संभाषणे अविस्मरणीय वाटली. मनाला लुब्ध करणाऱ्या या गोष्टी वाचकांना सांगाव्या, हाच या निवेदनाचा हेतू आहे. – ग. प्र. प्रधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत | Dr. Babasaheb Ambedkar tyanchyach shabdant
₹70.00हे पुस्तक लिहिण्याची पद्धत मोठी अफलातून आहे. प्रत्यक्ष न घेतलेल्या (काल्पनिक) मुलाखतींवर हे पुस्तक आधारलेले आहे. तरीही मुलाखती वास्तवच वाटतात. पुस्तकाची अशी रचना केली आहे की, एकदा वाचायला सुरुवात केल्यावर पुढे वाचतच राहावेसे वाटते.
मुलाखती काल्पनिक तरीही वास्तवावर आधारलेल्या असल्याने, बाबासाहेबांच्या हयातीनंतरच्याही काही घटना या पुस्तकात आल्या आहेत. त्याबाबतही बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आले आहेत, ते बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त विचारांचा समावेश करता यावा म्हणून. त्यात खटकण्यासारखे काही नाही.
बाबासाहेबांचे म्हणणे बाबासाहेबांच्या तोंडून इतक्या सोप्या भाषेत सांगणे हे अवघड काम आहे. प्रधानसरांनी ते यशस्वीपणे करून दाखविले आहे.
Reviews
There are no reviews yet.