अशी एकेक गावे-नगरे! काही नदीच्या एका काठावर राहून दुसऱ्या काठाची मशागत करणारी. काही दोन्ही तीरांवर पंखासारखी पसरलेली. काही तीरावरच नव्हे तर प्रत्यक्ष प्रवाहावरही वसलेली! काही डोंगराच्या उतारावर संधपणे रवंथ करीत बसलेली. काही संकोचाने दरीआड वस्त्रांतर करणारी. काही एखाद्या गोत्रपुरुषासारखी भव्य आणि उदार. काही कंजूष आणि कर्मदरिद्री. काही मधमाशांच्या पोळ्यांसारखी गजबज करणारी, काही कोळ्याच्या जाळ्यांइतकी निवांत. काही गर्भश्रीमंत काही नवश्रीमंत, काही राजाश्रयावर माजलेली, काही लोकाश्रयावर! काही काही केले तरी दरिद्रीच वाटणारी! काही चिरतरुण, चिरसुंदर, चिरसस्मित प्रत्येकाचा वेगळा सूर, वेगळा नूर. प्रत्येकाचा वेगळा गंध, वेगळा छंद… या गावांचे वेगवेगळे पाणी मला दिसले.
– वसंत बापट
Reviews
There are no reviews yet.