आतापर्यंत मी कोणालाही गुरु केलेले नाही, गांधी किंवा मार्क्सलाही नाही, हे त्यावरून स्पष्ट होईल. कारण या सतत बदलत्या विश्वाचे आणि मानवसमाजाचे अक्षरचित्र कोणापाशी कितीही दिव्यचक्षू असले तरी तो रेखांकित करू शकेल, असे मला वाटत नाही. कॅमेरा जशी क्षणचित्रे टिपतो तशीच आतापर्यंतच्या ऋषी- मुनींनी, विचारवंतांनी, प्रेषितांनी आणि विद्वानांनी टिपली आहेत. ती समाजचित्रे त्या काळाची, तत्क्षणीच्या परीस्थितीची चित्रे आहेत. म्हणून वेदकालीन चिंतन, कुरुक्षेत्रावरील चिंतन, बोधिवृक्षाखालील चिंतन हे, आजच्या चिंतनाला बंधनकारक ठरता कामा नये. याचा अर्थ ते सर्वस्वी त्याज्य ठरते, असाही नाही. नीर-क्षीर न्यायानेच त्याचा स्वीकार व्हावयास हवा. – ना. ग. गोरे
गोष्टी देशांतरीच्या | Goshti Deshantarichya
₹100.00एकाकीपणात गजबज भेटते. पण गजबज असूनही माणूस एकाकी असतो. एक टिचकी मारल्यावर कॅलिडोस्कोप हलतो. आतले रंग, आतल्या रेषा रचतात निराळाच अवकाश सर्वांत मोठी आकृती आहे ती मात्र पंचखंडी पृथ्वी अखंड अवकाश… – वसंत बापट
Reviews
There are no reviews yet.