Author

ना. ग. गोरे | N. G. Gore

15 जून 1907 ते 1 मे 1993 असे 85 वर्षांचे आयुष्य ना. ग. ऊर्फ नानासाहेब गोरे यांना लाभले. थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी पक्षाचे नेते, पुणे शहराचे महापौर, लोकसभा व राज्यसभा यांचे सदस्य, ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. 1982 ते 84 या काळात ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते. या सर्व धकाधकीच्या काळातही त्यांनी उत्तम दर्जाचे ललित व वैचारिक लेखन केले, त्यातून दोन डझन पुस्तके आकाराला आली. शिवाय, राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेत्यांच्या पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले, ती संख्या अर्धा डझन एवढी भरते.

Author's books

नारायणीय – निवडक ना. ग. गोरे | Narayaniya – Nivadak N. G. Gore

280.00

कॅमेरा जशी क्षणचित्रे टिपतो तशीच आतापर्यंतच्या ऋषी- मुनींनी, विचारवंतांनी, प्रेषितांनी आणि विद्वानांनी टिपली आहेत. ती समाजचित्रे त्या काळाची, तत्क्षणीच्या परीस्थितीची चित्रे आहेत. म्हणून वेदकालीन चिंतन, कुरुक्षेत्रावरील चिंतन, बोधिवृक्षाखालील चिंतन हे, आजच्या चिंतनाला बंधनकारक ठरता कामा नये. याचा अर्थ ते सर्वस्वी त्याज्य ठरते, असाही नाही. नीर-क्षीर न्यायानेच त्याचा स्वीकार व्हावयास हवा. – ना. ग. गोरे