Author

विजय पाडळकर | Vijay Padalkar

विजय पाडळकर यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1948 रोजी बीड, (मराठवाडा, महाराष्ट्र) येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील पाडळी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील वसंतराव पाडळकर हे उप-शिक्षणाधिकारी होते तर आई वासंतिका [कालिंदी] या गृहिणी होत्या. वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत, म्हणून विजय पाडळकर यांचे शिक्षण देगलूर, कंधार, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या गावी झाले. इ.स. 1972 साली ते नांदेडच्या पीपल्स कॉलेजमधून एम.कॉमची परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. कॉलेज शिक्षण घेत असतानाच, इ.स. 1970 साली, विजय पाडळकर यांनी महाराष्ट्र बँकेत नोकरी पत्करली.

25 जानेवारी 1977 रोजी विजय पाडळकर यांचा विवाह अंबाजोगाई येथील पुष्पा विष्णुपंत कह्राडे यांच्याशी झाला. या दांपत्यास क्षिप्रा, क्षमा, मुग्धा आणि क्षितीज अशी चार मुले आहेत. बँकेच्या नोकरीत पाडळकरांनाही वरचेवर बदल्यांना सामोरे जावे लागले. मात्र नोकरीचा कार्यकाल संपण्यापूर्वीच इ.स. 2001 साली त्यांनी लेखनाला पूर्ण वेळ देण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

Author's books

नवी पुस्तके

मुलांसाठी पथेर पांचाली | Mulansathi Pather Panchali

125.00

या पुस्तकातून मी नवे काही शिकलो नाही, पण हे पुस्तक वाचून अनेक गोष्टी नव्या व ताज्या दृष्टीकोनातून पहिल्या…
– रवींद्रनाथ टागोर
‘पथेर पांचाली’ ही बंगाली कादंबरी विभूतीभूषण बंद्योपाध्याय यांनी 1929 मध्ये लिहिली, ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांनी स्वतःच त्या कादंबरीतून मुलांसाठी स्वतंत्र आवृत्ती 1942 मध्ये काढली, तिला त्यांनी ‘आंब्याच्या कोयीची पुंगी’ असे नाव दिले. त्या आवृत्तीला चित्रे काढण्याचे काम एका बावीस वर्षे वयाच्या तरुण चित्रकाराकडे सोपवले गेले. त्याचे नाव सत्यजित राय. त्या चित्रकाराच्या मनात ती कादंबरी इतकी रुतून बसली की, त्यानंतर बारा वर्षांनी त्याने एक चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले तेव्हा ती कथा निवडली. 1955 मध्ये आलेला तो बंगाली चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरला. परिणामी ‘पथेर पांचाली’ ही कादंबरी आणखी चर्चिली गेली, वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित झाली. मात्र मुलांसाठी केलेली ती छोटी आवृत्ती बंगालीमध्ये प्रचंड लोकप्रिय असूनही अन्य भाषांमध्ये फारशी अनुवादित झाली नाही. आता मराठीमध्ये प्रथमच आली आहे आणि तीसुद्धा सत्यजित राय यांनी बंगाली आवृत्तीसाठी केलेली चित्रे व मुखपृष्ठ यांच्यासह…!