Author

विभूतीभूषण बंद्योपाध्याय | Bibhutibhushan Bandyopadhyaay

(जन्म :12 सप्टेंबर 1899 – मृत्यू : 1 सप्टेंबर 1950). जागतिक ख्यातीचे बंगाली कादंबरीकार. चोवीस परगणा जिल्ह्यातील मुरारिपूर गावी जन्म. बनग्राम हायस्कूलमधून 1914 साली ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले व कलकत्त्याच्या रिपन कॉलेजमधून 1918 साली बी.ए. झाले. हुगळी जिल्ह्यातील जांगिपाडा गावच्या शाळेत प्रथम शिक्षक म्हणून लागले. त्यानंतर सोनारपूर हरिनाभि स्कूल, कलकत्त्याचे खेलात् चंद्र मेमोरियल स्कूल व शेवटी बरॅकपूरजवळील गोपालनगर हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. मध्यंतरी भागलपूरच्या खेलात् घोष इस्टेटचे उप-तालुकाधिकारी म्हणून काही काळ त्यांनी काम केले.

या इस्टेटचे काम बघत असताना भागलपूरला लिहिलेली पथेर पांचाली (1929) हीच बिभूतिभूषण यांची प्रथम कादंबरी होय. याशिवाय कथा, कादंबऱ्या, शिशुसाहित्य इ. प्रकारांतील त्यांचे पन्नासहून अधिक ग्रंथ प्रकाशित आहेत. यांपैकी मेघमल्लार (1931) मौरीफूल (1932), जात्राबदल (1934), ताल नवमी (1944) हे कथासंग्रह आणि अपराजित (1931), दृष्टीप्रदीप (1935), आरण्यक (1938), आदर्श हिंदू हॉटेल (1940), देवयान (1944), केदार राजा (1945), इच्छामती (1949) या कादंबऱ्या विशेष महत्त्वाच्या आहेत.

Author's books

Saleनवी पुस्तके

मुलांसाठी पथेर पांचाली | Mulansathi Pather Panchali

100.00

या पुस्तकातून मी नवे काही शिकलो नाही, पण हे पुस्तक वाचून अनेक गोष्टी नव्या व ताज्या दृष्टीकोनातून पहिल्या…
– रवींद्रनाथ टागोर
‘पथेर पांचाली’ ही बंगाली कादंबरी विभूतीभूषण बंद्योपाध्याय यांनी 1929 मध्ये लिहिली, ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांनी स्वतःच त्या कादंबरीतून मुलांसाठी स्वतंत्र आवृत्ती 1942 मध्ये काढली, तिला त्यांनी ‘आंब्याच्या कोयीची पुंगी’ असे नाव दिले. त्या आवृत्तीला चित्रे काढण्याचे काम एका बावीस वर्षे वयाच्या तरुण चित्रकाराकडे सोपवले गेले. त्याचे नाव सत्यजित राय. त्या चित्रकाराच्या मनात ती कादंबरी इतकी रुतून बसली की, त्यानंतर बारा वर्षांनी त्याने एक चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले तेव्हा ती कथा निवडली. 1955 मध्ये आलेला तो बंगाली चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरला. परिणामी ‘पथेर पांचाली’ ही कादंबरी आणखी चर्चिली गेली, वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित झाली. मात्र मुलांसाठी केलेली ती छोटी आवृत्ती बंगालीमध्ये प्रचंड लोकप्रिय असूनही अन्य भाषांमध्ये फारशी अनुवादित झाली नाही. आता मराठीमध्ये प्रथमच आली आहे आणि तीसुद्धा सत्यजित राय यांनी बंगाली आवृत्तीसाठी केलेली चित्रे व मुखपृष्ठ यांच्यासह…!