Sale

80.00

Tin Talaq Viruddha Pach Mahila | तीन तलाक विरुद्ध पाच महिला

तीन तलाक विरुद्ध पाच महिला (रिपोर्ताज) – शायराबानो व अन्य चार महिलांनी न्यायालयीन लढाई दिली आणि सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक अवैध ठरवला. त्या पाच महिलांशी त्यांच्या गावात जाऊन केलेला संवाद.

            

Share

Meet The Author

तुम्ही म्हणाल दोन माणसांच पटत नसेल आणि ते वेगळे झाले तर त्यात इतका बाऊ करण्याचं कारण काय ? अगदी रास्त मुद्दा आहे. परंतु दोन व्यक्तींना न्याय्य पद्धतीनं वेगळं होण्याची समान संधी मिळत नसेल तर… तर अस्वस्थ नाही होणार तुम्ही? किमान मी तरी स्वस्थ नाही राहू शकत. अचानक एक दिवस कोणी येऊन म्हणत असेल की, ‘आत्ता या क्षणापासून तू माझी बायको नाहीस, ही तुझी मुलं नाहीत. मी तुला हराम आहे. तू मला हराम आहे. नाही तर, ही तुझी मुलं घे अन् इथून चालती हो.’ तर..? संसार मोडतो, घर सुटतं; तेव्हा त्या बाईची काय अवस्था होत असेल ? ‘सैरभैर होणं’ या शब्दांतून आपल्यापर्यंत जे पोहोचतं, त्याहून काही तरी अधिक भयंकर असणार- जे त्या प्रत्यक्ष अनुभवतात. या पाच जणी त्यातून गेल्या. या पाच जणींत सारंच साम्य आहे. त्यांच्या पतींनी एकतर्फी मनमानी तलक दिला. या तलाकने त्या भेदरल्या. रडल्या. खचल्या. कोलमडून पडल्या. संसार मोडला म्हणून नैराश्यातही गेल्या. हळूहळू स्वत:चं विस्कटलेपण त्यांनी सावरून घेतलं आणि उभ्या राहिल्या.

सभोताल सारं पेटलेल असताना, जमातवाद वाढलेला असताना, धर्माची मुळ खोलवर रुजलेली आणि प्रत्यक्ष जगण्यात सगळं टोकदार झालेलं असताना या पाच जणी उभ्या ठाकल्या. सोपं वाटत ना असं म्हणायला? पण ते किती अवघड होतं, हे त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिल.

Weight 0.1 kg
Dimensions 14 × 0.5 × 21.5 cm
Size

M, S

Pages

80

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Tin Talaq Viruddha Pach Mahila | तीन तलाक विरुद्ध पाच महिला”

Your email address will not be published.