Sale

1,920.00

Nivadak Sadhana Granthasanch – Khand 1 Te 8 | निवडक साधना ग्रंथसंच – खंड 1 ते 8

15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचे हीरकमहोत्सवी वर्ष आले तेव्हा, तोपर्यंतच्या सहा दशकांतील जवळपास तीन हजार अंकांमधून 205 लेख निवडले होते. त्या लेखांचे वर्गीकरण आशय व विषय यानुसार करून आठ खंड प्रकाशित केले होते. विविध क्षेत्रांतील 120 व्यक्तींनी लिहिलेले ते लेख आहेत. 2007 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथसंचाची नवी आवृत्ती साधनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात आणली आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील राजकीय-सामाजिक जीवनात डोकावण्यासाठी हा संच विशेष उपयुक्त आहे.

       

 

Share

Meet The Author

खंड 1

15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले आणि 11 जून 1950 रोजी त्यांचे निधन झाले. म्हणजे जेमतेम पावणे दोन वर्षे ते साधनाचे संपादक होते.  त्या पावणेदोन वर्षांच्या काळात त्यांनी साधनात लहान-मोठे असे शंभरहून अधिक लेख लिहिले, त्यातील  निवडक नऊ लेख या खंडातील पहिल्या विभागात आहेत.

 गुरुजींचे निधन झाल्यानंतरच्या सहा दशकांत, साधना  साप्ताहिकातून अनेक लहान-थोरांचे लेख वेगवेगळ्या निमित्ताने प्रसिद्ध होत राहिले, ती संख्या पाचशेच्या घरात असावी. त्यातील निवडक 25 लेख या खंडातील दुसऱ्या विभागात आहेत.
खंड 2
साधना साप्ताहिकाच्या साठ वर्षांपर्यंतच्या वाटचालीत साने गुरुजींच्या नंतर आचार्य जावडेकर,  रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते,  नानासाहेब गोरे, वसंत बापट व प्रधान व नरेंद्र दाभोलकर हे साधनाचे मुख्य संपादक राहिले आहेत. या सर्वांनी लिहिलेले प्रत्येकी एक-दोन लेख तर या खंडात आहेतच, शिवाय कार्यकारी संपादक, संपादक मंडळातील सदस्य, सल्लागार संपादक वा अतिथी संपादक म्हणून कमी अधिक काळ काम केलेल्या काही व्यक्तींचेही प्रत्येकी एक-दोन लेख आहेत. त्यामध्ये एस. एम. जोशी,  सदानंद वर्दे,  रा. ग . जाधव,  जयदेव डोळे, रझिया पटेल, हेरंब कुलकर्णी,  विनोद शिरसाठ यांचा सामावेश आहे. एकूण 48 लेखांचा समावेश असलेल्या या खंडात साधनाच्या संपादकीय भूमिकेचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते…
खंड 3
साधना साप्ताहिकाची ओळख एक वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक अशीच राहिली आहे.  हीरक महोत्सवापर्यंतच्या वाटचालीत ‘साधनाची वैचारिक विचारप्रणाली कोणती’ असा प्रश्न विचारला जात असे तेव्हा, ‘लोकशाही समाजवाद’ हेच उत्तर दिले जात असे.  या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाचे असे 16 लेख या खंडात समाविष्ट केले आहेत.  यातील आठ लेख, लोकशाही समाजवाद हे ध्येय समोर ठेवून संसदीय वा चळवळीचे राजकारण करणाऱ्या व्यक्तीचे आहेत. तर आठ लेख राजकीय-सामाजिक विषयावरील अभ्यासक-संशोधकांचे आहेत. लोकशाही समाजवाद ही संकल्पना भारताच्या संदर्भात समजून घेण्यासाठी हा खंड उपयुक्त आहे.
खंड 4
पुरोगामी या संकल्पनेला अभिप्रेत असलेल्या सर्व राजकीय-सामाजिक चळवळींना व आंदोलनांना साधना साप्ताहिकाने सदैव पाठिंबा दिला आहे. विषमतेविरुद्ध लढणाऱ्या आणि समतेचा विचार पेरणाऱ्या अनेक संस्था-संघटनांसाठी साधना हे हक्काचे विचारपीठ राहिले आहे. त्यांच्या अनेक कार्यक्रमांना व उपक्रमांना साधना साप्ताहिकातून भरपूर जागा सातत्याने दिली गेली आहे. परिणामी, सहा दशकांच्या काळात झालेल्या चळवळी व आंदोलने यांच्याशी हजाराहून अधिक लहान-मोठे लेख साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील निवडक 24 लेख या खंडात समाविष्ट केले आहेत, एकूण आठ विभागांत त्यांचे वर्गीकरण केले आहे. प्रबोधन, रचना व संघर्ष या तिन्ही प्रकारांतील चळवळी व आंदोलने यांची झलक यातून दिसेल.
खंड 5
साधना साप्ताहिकातून राजकीय विषयावरील विश्लेषक व चिकित्सक लेखन खूप मोठ्या प्रमाणात सातत्याने प्रसिद्ध होत राहिले. त्या तुलनेत आर्थिक विषयावरील लेखन कमी प्रसिद्ध होत राहिले. मात्र साधनातील राजकीय लेखनातून आर्थिक विचार किंवा अर्थकारणाबाबतचे आग्रह या ना त्या प्रकारे ठळकपणे डोकावत राहिले. प्रस्तुत खंडातही तेरा लेख राजकीय विषयावरील आहेत आणि पाच लेख आर्थिक विषयावरील आहेत. सर्व 18 लेख एकत्रित वाचल्यावर राजकीय-आर्थिक विचारांचे प्रतिबिंब स्पष्ट दिसणार नाही, मात्र राजकीय-आर्थिक क्षेत्रातील विविध दालनांकडे वळण्यासाठी हे लेख निश्चितच उपयुक्त ठरतील…
खंड 6
साधना साप्ताहिकातून सामाजिक विषयावरील लेखन मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत राहिले, त्याचबरोबर सांस्कृतिक विषयावरीलही उत्तम दर्जाचे लेखन सातत्याने प्रसिद्ध होत राहिले. मात्र साधनाची ओळख सामाजिक विषयावरील लेखनासाठी जेवढी ठळक आहे, तेवढी सांस्कृतिक विषयांवरील लेखनासाठी नाही. कदाचित राजकीय व सामाजिक या ठळक ओळखीमुळे तसे झाले असावे किंवा सांस्कृतिक या विषयावरील लेखन प्रामुख्याने संकीर्ण या प्रकारातील असल्याने तसे झाले असेल. सहा दशकांचा विचार करता, साधनातून राजकीय व आर्थिक यांच्यापेक्षा सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील लेखांची संख्या निश्चितच जास्त आहे. त्यातील निवडक 20 लेख या खंडात आहेत.
खंड 7
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक या व अशा ठळक कोणत्याच प्रकारांमध्ये बसवता येत नाही. मात्र, अशा दोन-तीन वा अधिक घटकांचा कमी-अधिक  समावेश असलेल्या 41 लेखांचा हा खंड आहे. हे सर्वच लेख चार-सहा पानांचे व पटकन् वाचून होतील आणि तरीही विचाराला खाद्य म्हणजे असे हमखास काहीतरी देतील अशा स्वरूपाचे आहेत. या लेखांची भाषा, शैली व विचार प्रतिपादन पाहता यातील बहुतांश लेखांचे नाते मराठीतील पूर्वीच्या काळातील लघु निबंध या लोकप्रिय लेखन प्रकाराशी जोडता येईल. त्यामुळे बहुतांश वाचकांना निवडक साधनाच्या आठ खंडांपैकी हा खंड जास्त भावतो. अशा प्रकारचे असंख्य लेख त्या साठ वर्षांत साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेले आहेत, मात्र या खंडात आले आहेत ते केवळ कवडसे.
खंड 8
निवडक साधना ग्रंथसंचातील खंड 1 ते 7 मध्ये साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेले निवडक लेख आहेत. या आठव्या खंडातील लेख मात्र साधना साप्ताहिकातून  प्रसिद्ध झालेले नसून, खास या ग्रंथ संचासाठी लिहून घेतले आहेत. साधनाच्या साठ वर्षांच्या वाटचालीकडे ओझरता दृष्टिक्षेप टाकणारे आहेत. यातील सुरुवातीचे पाच लेख साधना अंकातील विशिष्ट प्रकारच्या लेखनासंदर्भात आहेत आणि नंतरचे नऊ लेख साधनाने विशिष्ट घटनाप्रसंगी वा विशिष्ट विषयावर कोणत्या प्रकारचे लेखन प्रसिद्ध केले व काय भूमिका घेतल्या याचे विवेचन-विश्लेषण करणारे आहेत.
Weight 2 kg
Dimensions 14 × 10 × 21.5 cm
Size

M, S

Pages

1200

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Nivadak Sadhana Granthasanch – Khand 1 Te 8 | निवडक साधना ग्रंथसंच – खंड 1 ते 8”

Your email address will not be published.