Author

साने गुरूजी | Sane Guruji

साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत. कोर्टाचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात 24 डिसेंबर, इ.स. 1899 रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. [1]

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (1924 ते 1930) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.

इ.स. 1928 साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. 1930 साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (1936) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. 1942 च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली.

साने गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.

Author's books

Saleनवी पुस्तके

Bharatiya Sanskruti | भारतीय संस्कृती

200.00
एका सामान्य माणसाने सामान्य जनांकरिता लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात पांडित्य नाही, विद्वत्ता नाही. शेकडो ग्रंथांतील आधार व संदर्भवचने वगैरे येथे काहीएक नाही. येथे प्राच्यविद्याविशारदत्व नाही, गहनगंभीर गूढ असे काही नाही. या पुस्तकात एक विशिष्ट दृष्टी मात्र आहे. यात भारतीय संस्कृतीचा इतिहास नाही. कलाक्षेत्रात वा ज्ञानविज्ञानाच्या प्रांतात, व्यापारात वा राजकारणात आम्ही कसे पुढारलेले होतो, त्याची माहिती येथे नाही. चंद्रगुप्त व अशोक, कालिदास व तानसेन, आर्यभट्ट व भास्कराचार्य यांचे अभिनव इतिहास येथे नाहीत. भारतीय संस्कृतीच्या आत्म्याची येथे भेट आहे. तिच्या अंतरंगाचे येथे दर्शन आहे.भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यात प्रवेश आहे.
– साने गुरुजी

         

Saleनवी पुस्तके

Namdar Gokhale Charitra | नामदार गोखले चरित्र

200.00

१८६६ ते १९१५ असे जेमतेम ४९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे सार्वजनिक आयुष्य तीन दशकांचे होते. नेक नामदार अशी त्यांची ओळख देशभर रूढ झाली. पण त्यांची सुरुवातीची ओळख सुधारकाग्रणी गो. ग. आगरकर व न्या. म. गो. रानडे यांचे शिष्य अशी होती. तर अखेरच्या काळातील ओळख मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरू अशी होती.

त्यांचे दहावे स्मृतीवर्ष आले तेव्हा, म्हणजे १९२४ मध्ये त्यांचे चरित्रलेखन स्पर्धा मुंबई विद्यापीठाने जाहीर केली. त्या स्पर्धेत पांडुरंग सदाशिव साने या २४ वर्षांच्या तरुणाने भाग घेतला, तेव्हा तो नुकताच एम.ए. झाला होता. त्या तरुणाने पुस्तक लिहायला सुरुवात तर लगेच केली, पण ते वाढत गेले आणि दरम्यान, स्पर्धेसाठी लेखन सादर करण्याची मुदत संपून गेली.

आणि मग ते हस्तलिखित, त्या तरुणाच्या दत्तो वामन पोतदार या शिक्षकाने एका प्रकाशकाकडे सोपवले. ते पुस्तक फेब्रुवारी १९२५ मध्ये प्रकाशित झाले. नामदार गोखले यांचे विस्तृत म्हणावे असे ते पहिले चरित्र आणि त्या तरुणाचे प्रकाशित झालेले ते पहिले पुस्तक. त्यानंतर पाच वर्षांनी तो तरुण, संपूर्ण महाराष्ट्रात साने गुरुजी या नावाने ओळखला जाऊ लागला.

 

   

Shyamchi Aai | श्यामची आई

160.00

अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे? ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’मध्ये आहे, तसे गुरुजींच्या ‘श्यामची आई’ मध्येही आहे.

-आचार्य अत्रे

     

धडपडणारा श्याम । Dhadpadnara Shyam

140.00

‘धडपडणारा श्याम’ मध्ये दापोलीहून शिक्षणासाठी औंधला जाणे, सहा महिन्यांनी औंध सोडून पुण्यात येऊन मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हा वय वर्षे 15 ते 18 हा कालखंड आला आहे. औंध आणि पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.

            

Saleनवी पुस्तके

मानवजातीची कथा | Manavjatichi Katha

320.00

या पुस्तकात इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी मांडल्या आहेत. त्या-त्या घडामोडीतील महत्त्वाच्या व्यक्तींभोवती त्या-त्या घडामोडी रंगविल्या आहेत.या जगात स्थूल दृष्टीने दोन प्रकारचे नेते आढळतात : 

संस्कृती व सुधारणा यांना पुढे नेणारे आणि त्यांना मागे खेचणारे. शांतीचे पुरस्कर्ते पहिल्या वर्गात येतात. युद्धे पेटविणारे दुसऱ्या वर्गात येतात. जे मोठमोठे धर्मसंस्थापक होऊन गेले, त्यांनी ‘शांतीनेच खरी प्रगती होते’ या तत्त्वावरील आपली श्रद्धा आपल्या जीवनात उत्कटपणे दाखविलेली आहे. इतिहासाचे नीट निरीक्षण केल्यास आपणास कबूल करावे लागेल, की धर्मसंस्थापकांची ही श्रद्धा यथार्थ आहे. ही श्रद्धा म्हणजे केवळ धर्मग्रंथांतील आशावाद नव्हे; ही श्रद्धा स्वतः सिद्ध असे इतिहासातील एक सत्य आहे.

‘शांतीचे दूतच पृथ्वीचे वारसदार होतील’ हा दृष्टिकोन ‘मानवजातीची कथा ‘ हे पुस्तक लिहिताना डोळ्यांसमोर आहे.

     

श्याम | Shyam

160.00

२४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना मिळाले. त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा २२ वर्षांचा कालखंड कोणी लिहिलेला नाही. त्यासाठीच त्यांनी स्वतःच लिहिलेली चार पुस्तके हाच काय तो मुख्य दस्तावेज. श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवन विकास याच त्या चार आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या. श्यामची आई मध्ये गुरुजींनी आपल्या आईला केंद्रस्थानी ठेवून बालपण मांडले आहे, त्यात नंतरचा काळही थोडा येऊन जातो. श्याम या पुस्तकात पाचवी साठी पुण्यात मामाकडे येणे, सहा महिन्यानंतर पुणे सोडून दापोलीत चार वर्षे आतेकडे राहून शिक्षण घेणे हा कालखंड आला आहे. शालेय वयातील श्यामचे भावविश्व, विचारविश्व, श्यामचे अनुभव आणि त्यावरील श्यामचे चिंतन  ‘श्याम’ मधे आले आहे.

श्याम पाचवी साठी पुण्यात मामाकडे येणे, सहा महिन्यानंतर पुणे सोडून दापोलीत चार वर्षे आतेकडे राहून शिक्षण घेणे हा कालखंड आला आहे. शालेय वयातील श्यामचे भावविश्व, विचारविश्व, श्यामचे अनुभव आणि त्यावरील श्यामचे चिंतन ‘श्याम’ मधे आले आहे.

            

श्यामचा जीवनविकास । Shyamcha Jivanvikas

100.00

‘श्यामचा जीवनविकास’ या पुस्तकात मॕट्रिकचे वर्ष आणि महाविद्यालयीन शिक्षणाची तीन वर्ष हा वय वर्ष 19 ते 22 हा कालखंड आला आहे. पण हा कालखंड पूर्ण आणि विस्ताराने येत नाही.
पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.

            

Saleनवी पुस्तके

श्यामची आई | Shyamchi Aai

240.00

साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित, सुजय डहाके दिग्दर्शित नवा चित्रपट २०२३ च्या दिवाळीत येत आहे. त्या निमित्ताने त्या पुस्तकाची ही नवी आवृत्ती, आता साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

पुस्तकात ४२ प्रकरणे आहेत, त्यातील विविध प्रसंगांना अनुरूप अशी सिनेमातील ३५ छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सिनेमातील श्यामची आई व वडील, आणि श्यामची भावंडे आहेत. आकर्षक छपाई व हार्ड बाऊंड स्वरूपातील ही आवृत्ती, कोणीही कोणालाही भेट देण्यासाठी आणि संग्रहात ठेवण्यासाठीही महत्वाचा ऐवज आहे.

1 2