Saleनवी पुस्तके

240.00

श्यामची आई | Shyamchi Aai

साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित, सुजय डहाके दिग्दर्शित नवा चित्रपट २०२३ च्या दिवाळीत येत आहे. त्या निमित्ताने त्या पुस्तकाची ही नवी आवृत्ती, आता साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

पुस्तकात ४२ प्रकरणे आहेत, त्यातील विविध प्रसंगांना अनुरूप अशी सिनेमातील ३५ छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सिनेमातील श्यामची आई व वडील, आणि श्यामची भावंडे आहेत. आकर्षक छपाई व हार्ड बाऊंड स्वरूपातील ही आवृत्ती, कोणीही कोणालाही भेट देण्यासाठी आणि संग्रहात ठेवण्यासाठीही महत्वाचा ऐवज आहे.

Share

Meet The Author

साने गुरुजींनी १९३३ मध्ये नाशिकच्या तुरुंगात असताना फक्त पाच दिवसांत लिहिलेले श्यामची आई हे पुस्तक, नंतरच्या नऊ दशकांत महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात माईलस्टोन ठरले. त्याच पुस्तकावर आधारित, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट १९५३ मध्ये आला, त्यानेही नंतरच्या सात दशकांत महाराष्ट्राच्या जनमनात स्थान मिळवले. आणि तरीही २०२३ मध्ये, दिग्दर्शक सुजय डहाके यांनी त्याच पुस्तकावर नवा चित्रपट आणला आहे. तो जाणीवपूर्वक कृष्णधवलच केला आहे. साने गुरुजी आणि श्यामची आई यांच्या प्रतिमा नव्याने उजळून काढणारा, किंबहुना त्या प्रतिमांना नवे आयाम बहाल करणारा असा तो झाला आहे. त्या चित्रपटातील विविध प्रसंगांतील छायाचित्रे समाविष्ट करून श्यामची आई या पुस्तकाची काढलेली ही नवी आवृत्ती आहे. मूळच्या आशयाला व अर्थातच त्या विषयाला अधिक सुबोध व आकर्षक आणि अधिक गहन व गंभीर पद्धतीने सादर करण्यासाठी ही आवृत्ती उपयुक्त ठरेल.

Weight 0.25 kg
Dimensions 14 × 1.8 × 21.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्यामची आई | Shyamchi Aai”

Your email address will not be published.