Sale

140.00

अशानं आसं व्हतं | Ashana Asa Vhata

अशानं आसं व्हतं (आत्मकथनात्मक) – एका दहा – बारा वर्षांचा खेड्यातील मुलगा त्याच्या सभोवतालच्या जगाविषयी सांगतो ते अनुभव खानदेशातील तावडी बोलीत पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहे.

     

Share

Meet The Author

पूर्व खानदेशातील काही गावांत ‘तावडी बोली’ बोलली जाते. त्या बोलीतील हे पुस्तक आहे. एका आठ-दहा वर्षांच्या मुलाने पाहिलेले व अनुभवलेले, त्या गाव-परिसरातील समाजजीवन असे याचे स्वरूप आहे. यातील अनुभवांचा सच्चेपणा व भावभावनांची तरल वीण अनोख्या भावविश्वात घेऊन जाते. या लेखनातून गरिबी, दुःख, दैन्य, निराशा हे सर्व पाहायला मिळते, याचे कारण प्रामुख्याने भौतिक साधनांचा अभाव. आणि याच लेखनातून प्रेम, जिव्हाळा, नातेसंबंध, त्याग व सहजीवन यांचेही दर्शन घडते; त्यातून एका सुखी समाजजीवनाचे कवडसे पाहायला मिळतात.

पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीचे हे चित्रण आहे. त्या भागातील ज्या गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शाळा, आरोग्य व अन्य पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत, तेथील परिस्थिती बदलली आहे; चांगल्या व वाईट या दोन्ही अर्थांनी! मात्र ज्या गावांमध्ये अशा पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत, म्हणजे आधुनिकतेचे वारे अद्याप वाहिलेले नाही; तेथील परिस्थिती अद्यापही तशीच आहे. याचाच अर्थ, या पुस्तकातील समाजजीवन हा भूतकाळ आहे आणि वर्तमानही!

– सुशील पगारिया

Size

M, S

Pages

148

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अशानं आसं व्हतं | Ashana Asa Vhata”

Your email address will not be published.