Author

माजिद नवाझ | Maajid Nawaz

माजिद नवाझ हे पाकिस्तानी पार्श्वभूमी असलेल्या आई वडिलांच्या पोटी ब्रिटनमध्ये जन्माला आलेले ब्रिटिश नागरिक आहेत. त्यांनी लंडनमधील SOAS या संस्थेतून राज्यशास्त्र आणि अरेबिक भाषा हे विषय घेऊन पदवी घेतली. वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते हिझ्ब-उत-तहरीर या इस्लामवादी संघटनेचे काम करू लागले. याच कामात दंग असताना वयाच्या चोविसाव्या वर्षी इजिप्तमध्ये अटक होऊन त्यांची रवानगी अलेक्झान्द्रीया शहरातील एका कुप्रसिद्ध तुरुंगात झाली. त्याच वेळी अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने त्यांचे कोवळे वय आणि शिक्षण बघून त्यांचे नियमित समुपदेशन सुरु केले. त्यांच्या हातून अद्यादि एकही हत्या झालेली नाही, हा मुद्दा अधोरेखित करून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु केले. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलची सद्भावना आणि क्षमाशीलता बघून माजिद यांचे हृदय परिवर्तन झाले व सुटका होताच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून राजनीतीशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच, समविचारींना बरोबर घेऊन अतिरेकी इस्लामवादाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी 'क्विलिअम' ही संस्था स्थापन केली. आज ते केवळ इस्लामच नाही, तर सर्व धर्मांमध्ये लोकशाही, मानवतावाद, उदारमतवाद आणि स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये रुजावीत यासाठी सातत्याने लेखन आणि व्याख्यानांचे दौरे करतात. त्याचे रॅडिकल' हे आत्मकथन खूप गाजले.

Author's books

इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य | Islam Aani Sahishnuteche Bhavitavya

120.00

उच्च शिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये ‘क्विलिअम’ ही संस्था स्थापन केली आहे, त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी, या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत. उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत. हे पुस्तक म्हणजे त्या दोघांनी केलेल्या चर्चेचे शब्दश: परिलेखन आहे.