Author

सॅम हॅरिस | Sam Harris

सॅम हॅरिस हे अमेरिकेतील अत्यंत प्रथितयश, लोकप्रिय आणि उच्च विद्याविभूषित असे लेखक आहेत. त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान या विषयात पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस येथून न्युरोसायन्स या विषयात पीएच.डी. केले. त्यांचा इस्लाम, ख्रिथॅनिटी, हिंदू व बौद्ध या धर्मांचा सखोल अभ्यास असून त्यांनी आपल्या लेखनातून वारंवार धर्माच्या उपयुक्ततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या विचारांवर सुप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ आणि विचारवंत रिचर्ड डॉकिन्स यांच्या लेखनाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. हिंदू धर्मातील वेदांत, योगविद्या, ध्यानधारणा यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी बराच काळ भारतात आणि तिबेटमध्ये व्यतीत केला आहे. आधुनिक विज्ञानाच्या कसोट्या पाळून ध्यानधारणा कशी करता येईल, यावरील त्यांचे 'वेकिंग अप' हे पुस्तक, त्याचप्रमाणे स्पिरिच्युअॅलिटी विदाउट रिलीजन, एंड ऑफ फेथ, ही अन्य पुस्तकेही गाजली असून त्यांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. 'एंड ऑफ फेथ' या त्यांच्या पुस्तकास २००५ चे वैचारिक लेखनासाठीचे PEN हे अत्यंत प्रतिष्ठेचे पारितोषिक मिळाले आहे. धर्म, हिंसा, विज्ञान, नीतीशास्त्र, न्युरोसायन्समधील अद्ययावत संशोधन या विषयांवरील व्याख्याने TED टॉक, पॉडकॉम या मंचांवर लोकप्रिय आहेत.

Author's books

Islam Aani Sahishnuteche Bhavitavya | इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य

120.00

उच्च शिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये क्विलिअम ही संस्था स्थापन केली आहे, त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी, या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत. उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत. हे पुस्तक म्हणजे त्या दोघांनी केलेल्या चर्चेचे शब्दश: परिलेखन आहे.