Author

आनंद करंदीकर | Anand Karandikar

आनंद करंदीकर तरुणपणी युक्रांद चळवळीमध्ये सामील झाले. त्यानंतर उदगीर येथे त्यांनी दोन वर्षे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. IIT Mumbai इथून B. Tech व त्यानंतर IIM Calcutta मधून MBA केले व पुढे Ph.d. देखील केले. 'शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान कसे पोहोचवावे' हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय राहिलेला आहे. बेरोजगार तरुण आणि जमीन गमावलेले आदिवासी यांच्याबरोबर ते सत्याग्रहात सहभागी झाले; त्या त्या वेळी त्यांना दोन-दोन आठवड्यांचा कारावासदेखील झाला. Marketing and Econometric Consultancy Services (METRIC ) या भारतातील सर्वांत मोठ्या आणि 29 देशांत कारभार असलेल्या व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे प्रवर्तक आणि 25 वर्षे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या काळात त्यांचे वैचारिक लेखन चालूच होते. त्यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक इत्यादी विषयांवर मराठीतील लोकप्रिय वर्तमानपत्रे व नियतकालिकांतून विश्लेषणात्मक लेख लिहिलेले आहेत.

Author's books

वैचारिक घुसळण | Vaicharik Ghusalan

280.00

जो वाचक आनंद करंदीकर यांना प्रत्यक्ष ओळखत नाही किंवा ज्या वाचकांना त्यांचे लिखाण सोडून त्यांच्याविषयी अन्य माहिती नाही, अशा वाचकाने हे पुस्तक वाचून त्यांच्या वयाचा अंदाज करावा… लेखक तरुण आहे म्हणावं तर एवढा अनुभव, अभ्यास, प्रगल्भता आणि शहाणपण लहान वयात कसं येईल असं वाटेल, लेखक वृद्ध आहे असं म्हणावं तर लेखनातील दृष्टिकोन, भाषाशैली, विचार अगदी तरुण आहेत. शिवाय, अनुभवाच्या व अभ्यासाच्या आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर लेखक ‘कन्क्लुजन’ काढून रिकामा झालेला नाही. त्याने आणखी अभ्यासाचा व नवीन शिकण्याचा प्रवास थांबवलाय असं वाटत नाही.