Author

भिखू पारेख | Bhikhu Parekh

गुजरातमधील बलसाड जिल्ह्यातील एका खेड्यात 1935 मध्ये जन्मलेल्या भिखू पारेख यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आणि 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' मधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. ते युनिव्हर्सिटी ऑफ हलमध्ये अठरा वर्षे पोलिटिकल थिअरीचे, तर युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट मिनस्टरमध्ये आठ वर्षे पोलिटिकल फिलॉसॉफीचे प्राध्यापक होते. 1982 ते 85 या काळात त्यांनी बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही काम केले. 2007 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले. ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स' चे सभासद होण्याचा मानही त्यांना मिळाला. गंभीर वैचारिक विषयांवरील त्यांची डझनभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गांधीविचाराच्या संदर्भात ते जागतिक स्तरावरील महत्त्वाचे भाष्यकार मानले जातात.

Author's books

Saleनवी पुस्तके

टॉकिंग पॉलिटिक्स | Talking politics

160.00

एक तत्त्वज्ञ म्हणून भिखू पारेख यांनी आपली उभी हयात उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यात घालवली, कारण तत्त्वज्ञानाचा अर्थच तो असतो. आपल्या तत्त्वज्ञानाबाबत आणि तात्विक भूमिकांबद्दल ते नेहमीच दृढ आणि सुसंगत राहत आले आहेत, हे त्यांचा जीवनप्रवास पहिल्यांना पुरेपूर माहीत आहे. आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे त्यांनी समानतेबाबतच्या तत्त्वचिंतनासाठी आणि समानतेसाठीच्या प्रत्यक्ष लढ्यासाठी वेचली आहेत. तात्विक दृष्ट्या गहन आणि नैतिक दृष्ट्या बांधिलकी मांडणाऱ्या त्यांच्या चिंतनाची व्यापक पातळीवर प्रशंसा झालेली आहे आणि हे चिंतन मूलगामी स्वरूपाचे आहे असे मानले गेले आहे. त्यांच्या आयुष्याची आणि विचारांची ओळख करून देणारे हे संवादरुपी पुस्तक म्हणजे माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या आदराची निशाणी आहे. त्यांचा वैचारिक वारसा असे या पुस्तकाबाबत बोलणे हे अकाली होईल, पण कल्पनाही करता येणार नाही इतक्या व राजकीय शक्यतांचा पट त्यांनी इथे उघड केला आहे.