Author

दत्तप्रसाद दाभोलकर | Dattaprasad Dabholkar

दत्तप्रसाद दाभोळकरांचे बहुतेक लिखाण हे शोधपत्रिकेच्या अंगाने केलेले वैचारिक स्वरूपाचे लेखन आहे. कविता, कथा, कादंबरी या स्वरूपाचे साहित्य दाभोळकरांनी फारसे लिहिलेलेच नाही. कॉलेजमध्ये असताना काही दोन चार कविता केल्या असतील तेवढ्याच. त्यांतली एक कविता ’बिजली’ या काव्यसंग्रहात छापली गेली आहे. ’ढगांमागून गडगडत’ या नावाचा त्यांनी लिहिलेल्या बालगीतांचा संग्रह मात्र प्रकाशित झाला आहे.

Author's books

Saleनवी पुस्तके

मुलांसाठी विवेकानंद | Mulansathi Vivekanand

160.00

एक अनाम संन्यासी, शिक्षण फारसे नसलेला अस्वस्थ होऊन तीन वर्षे भारत उभा – आडवा पिंजून काढणारा हा देश, त्याची अवनती, त्याची कारणे आणि त्यावरचे उपाय अस्वस्थ होऊन शोधत हिंडणारा जगात काय, भारतात काय तो ज्या कलकत्ता शहरात लहानाचा मोठा झाला, त्या शहरातसुद्धा त्याचे नाव फारसे कोणाला माहीत नव्हते आणि एक दिवस अचानक भारतात नव्हे तर जगभर फक्त त्याच्याच नावाचा जयजयकार तुम्हाला माहीत आहे?
सर्वधर्म परिषदेचे आमंत्रण विवेकानंदांना नव्हते!
खिल्ली उडवून त्यांना परत पाठवले होते!
कसे मिळविले त्यांनी आमंत्रण ? कसे मिळविले त्यांनी अद्भुत यश?