Author

मिलिंद बोकील | Milind Bokil

मिलिंद बोकील हे मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांतून लेखन केले आहे. बारावीनंतर ते जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशी जोडले गेले. त्यांच्या 'छात्र युवा संघर्ष वाहिनी‘त ते काम करत होते.

मिलिंद बोकील यांची पहिली कथा, ’पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश‘ त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी लिहिली. ती 1981 मध्ये 'किर्लोस्कर' मासिकात प्रसिद्ध झाली. ती पुष्कळ गाजली.

मिलिंदे बोकील यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा डॉक्टरेटसाठीचा ’कातकरी - विकास की विस्थापन?‘ हा प्रबंध महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी पाणी व्यवस्थापनावर आधारित होता. विविध सरकारी समित्यांवर, प्रशिक्षण संस्था व बिगरशासकीय संघटनांमध्ये प्रकल्प साहाय्यक, संशोधन साहाय्यक, प्रकल्प समन्वयक, मुख्य संशोधन अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

Author's books

कहाणी पाचगावची | Kahani Pachgavchi

160.00

कहाणी पाचगावची (सामाजिक संशोधन) – चंद्रपूर जिल्ह्यातील पाचगाव या लहानशा खेड्याने मागील दहा वर्षांत स्वतःचा कायापालट करून घेतला, त्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास-संशोधन करून लिहिलेले पुस्तक.

            

Saleनवी पुस्तके

गोष्ट मेंढा गावाची | Goshta Mendha Gavachi

240.00

मेंढा गावाची ही गोष्ट कशासाठी सांगितली आहे? ही एवढ्यासाठीच सांगितली आहे की ज्यांना एरवी ग्रामीण-आदिवासी म्हणून संबोधले जाते ती माणसे किती शांतपणे, सभ्यपणे आणि तरीही किती निश्चयाने आपले जीवन जगत असतात ते बाकीच्यांना समजावे म्हणून. आज आपल्या खेड्यात असो वा शहरात, सर्वत्र नुसता दुराग्रह, हेकटपणा आणि असहकार भरून राहिलेला आहे. विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रगती झालेली असली तरी मानवी जीवन स्वस्थ आणि सुरक्षित नाही; उलट, त्यामध्ये अधिकाधिक भय आणि असुरक्षितता दाटून राहिलेली आहे. समुदायात जगताना निरामय, आनंदी, निर्भय जीवनाचा प्रत्यय येत नाही. मात्र या गोष्टींची तहान माणसाला कायमच आहे आणि म्हणून अशा उदाहरणांचा मानवी मन सदैव वेध घेत असते. मेंढा हे असले एक उदाहरण आहे.

Saleनवी पुस्तके

महाराष्ट्रातील प्रबोधन पुढील दिशा | Maharashtratil Prabodhan Pudhil Disha

70.00

धर्म राज्यसंस्थेला खातो म्हणजे काय ? धर्म काय वाघ आहे का की तो राज्यसंस्थेला खाईल ? राज्यसंस्था तर किती तरी बलवान असते. तिच्याकडे पोलीस, सैनिक, विमाने, रणगाडे असतात. धर्म कसा तिला खाईल ?
धर्म वाघासारखा खात नाही तर वाळवीसारखा खातो. धर्माची वाळवी कशी लागते ह्याचे उत्तम उदाहरण कुंभमेळ्याचे. कुंभमेळ्याने राज्यसंस्थेला आपली नेहमीची कार्ये बाजूला ठेवून भाविकांची व्यवस्था ठेवायला भाग पाडले. व्यवस्था म्हणजे काय? तर बांबूचे कठडे बांधणे, पार्किंगची व्यवस्था करणे, विशेष गाड्या सोडणे, इस्पितळे उभारणे, हरवले-सापडल्याची नोंद घेणे, इत्यादी. ह्या कामासाठी शेकडो अधिकारी आणि हजारो कर्मचाऱ्यांची फौज जुंपली गेली.
राज्यसंस्थेची शक्ती जी शाळा दवाखाने चालवणे, उद्योगधंदे उभारणे, जलसिंचन पुरवणे, कौशल्य-निर्मिती करणे, शेती सुधारणे अशा महत्त्वाच्या कामांसाठी लागली पाहिजे ती भाविकांच्या अंघोळीसाठी लावली गेली.
सर्वात शोचनीय गोष्ट म्हणजे केवळ निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाच नाही तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना धर्माने संगमावर डुबकी मारायला लावली. धर्म राज्यसंस्थेला खातो ते अशा प्रकारे !

मेळघाट : शोध स्वराज्याचा | Melghat : Shodh Swarajyacha

200.00

आपले गाव हे एक कुटुंब आहे असे समजून त्यातील प्रत्येक व्यक्तीची कदर करायची, आपल्या गावापलीकडेही एक मोठा समाज आहे हे लक्षात घेऊन त्याच्याशी नातेसंबंध जोडायचे आणि ह्या सर्वांमधून आपले जगणे अधिक अर्थपूर्ण करायचे- अशी कामना आहे. ह्यालाच स्वराज्य असे म्हणतात. स्वराज्य हे साधन आहे आणि साध्यही. हे प्रत्यक्षात कसे करता येईल, त्यामध्ये कोणत्या अडचणी येतील, त्या अडचणींचे निराकरण कसे करायचे ह्याचा शोध म्हणजे स्वराज्याचा शोध.