Author

रा. ग. जाधव | R. G. Jadhav

प्रा. रावसाहेब गणपतराव जाधव हे मराठीतील साहित्य समीक्षक होते. वेगळ्या वाटेचे आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी, दलित साहित्याचे स्वागत करणारे पहिले समीक्षक, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे आणि ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांच्या अंकांचे वाचन करून आठ खंडांचे संपादन करणारे साक्षेपी संपादन, सर्जनशील लेखन करणाऱ्या नवोदित लेखक-कवींना प्रोत्साहन देत त्यांना घडविणारे समीक्षक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू होते.

पुणे विद्यापीठातून एम.ए. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेज, अमरावती येथील विदर्भ महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय येथे 11 वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठी विश्वकोश प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी जाधव वाई येथे गेले. दोन दशकांच्या कामामध्ये त्यांनी संपादनाची कौशल्ये आत्मसात केली. मे. पुं. रेगे यांच्या निधनानंतर 2000 ते 2002 या कालावधीसाठी ते विश्वकोशाचे मुख्य संपादक झाले. ग.प्र. प्रधान यांच्यासमवेत त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील अंकांचे आठ खंडांमध्ये संपादन केले.

Author's books

Nivadak Sadhana Granthasanch – Khand 1 Te 8 | निवडक साधना ग्रंथसंच – खंड 1 ते 8

1,920.00

15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचे हीरकमहोत्सवी वर्ष आले तेव्हा, तोपर्यंतच्या सहा दशकांतील जवळपास तीन हजार अंकांमधून 205 लेख निवडले होते. त्या लेखांचे वर्गीकरण आशय व विषय यानुसार करून आठ खंड प्रकाशित केले होते. विविध क्षेत्रांतील 120 व्यक्तींनी लिहिलेले ते लेख आहेत. 2007 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथसंचाची नवी आवृत्ती साधनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात आणली आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील राजकीय-सामाजिक जीवनात डोकावण्यासाठी हा संच विशेष उपयुक्त आहे.

       

 

Saleनवी पुस्तके

Shastriji | शास्त्रीजी

160.00

‘प्रकांड पंडित’ हे विशेषण विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील विचारवंतांच्या संदर्भात वापरायचे असेल तर जी काही नावे पटकन समोर येतात, त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे नाव हमखास असतेच! 27 जानेवारी 1901 ते 27 मे 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. संस्कृत भाषा व साहित्य यातील त्यांची विद्वता विशेष उल्लेखनीय आणि धर्म, संस्कृती, साहित्य, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी केलेले अभ्यास-संशोधन व लेखन पायाभूत मानले जाते.

अशा या शास्त्रीजींच्या साथीत व संगतीत वाई येथे जवळपास दोन दशके वावरलेल्या रा. ग. जाधव यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. शिवाय, रा. ग. जाधव हे मराठीतील नामवंत साहित्य समीक्षक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांनी शास्त्रीजींचे कार्य आणि कर्तृत्व ज्या रसिकतेने व विश्लेषक बुद्धीने रेखाटले आहे, त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 

   

बापू : एकभाषित चिंतनकाव्य | Bapu : Ekbhashit Chintankavya

100.00

बापू : एकभाषित चिंतनकाव्य (स्मृतिरचना) – महात्मा गांधी यांच्या जीवनातील 77 प्रसंगांना शब्दरूप देताना रा. ग. जाधव सरांनी 70 वर्षे मनाच्या कोपऱ्यात दडलेले संचित बाहेर काढले आहे.

     

संध्यासमयीच्या गुजगोष्टी | Sandhyasamayichya Gujgoshti

160.00
संध्यासमयीच्या गुजगोष्टी (लेखसंग्रह) – जेष्ठ समीक्षक रा.ग. जाधव यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वत लिहिलेल्या – आत्मपर किंवा चिंतनपर म्हणावेत अशा – 28 ललित लेखांचा संग्रह.

     

हे मित्रवर्या | He Mitravarya

100.00

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर रा. ग. जाधव सरांनी लिहिलेल्या 67 स्मृतिरचना, त्या दोघांतील भावबंध दाखवणाऱ्या आहेत.