Author

रामीन जहानबेगलू | Ramin Jahanbegloo

1956 मध्ये इराणमधील तेहरान शहरात जन्मलेल्या रामीन जहानबेग्लू यांनी फ्रान्समधील सोर्बोन युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेट मिळवली. दोन दशके ते फ्रान्समध्ये राहिले. नंतर कॅनडामधील टोरोंटो युनिव्हर्सिटीत पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक म्हणून दशकभर काम केले. सध्या ते भारतातील ओ.पी.जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आणि सेंटर फॉर महात्मा गांधी स्टडीजचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. वेस्टर्न फिलॉसॉफी आणि मॉडर्निटी हा त्यांच्या अभ्यासाचा प्रमुख विषय असून, त्यांनी इंग्लिश, फ्रेंच व पर्शियन या तिन्ही भाषांमध्ये पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी आयझाया बर्लिन, अशीष नंदी, वंदना शिवा, सुधीर कक्कर, रोमिला थापर इत्यादी नामवंतांच्या घेतलेल्या दीर्घ मुलाखतींची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

Author's books

Saleनवी पुस्तके

टॉकिंग पॉलिटिक्स | Talking politics

160.00

एक तत्त्वज्ञ म्हणून भिखू पारेख यांनी आपली उभी हयात उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यात घालवली, कारण तत्त्वज्ञानाचा अर्थच तो असतो. आपल्या तत्त्वज्ञानाबाबत आणि तात्विक भूमिकांबद्दल ते नेहमीच दृढ आणि सुसंगत राहत आले आहेत, हे त्यांचा जीवनप्रवास पहिल्यांना पुरेपूर माहीत आहे. आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे त्यांनी समानतेबाबतच्या तत्त्वचिंतनासाठी आणि समानतेसाठीच्या प्रत्यक्ष लढ्यासाठी वेचली आहेत. तात्विक दृष्ट्या गहन आणि नैतिक दृष्ट्या बांधिलकी मांडणाऱ्या त्यांच्या चिंतनाची व्यापक पातळीवर प्रशंसा झालेली आहे आणि हे चिंतन मूलगामी स्वरूपाचे आहे असे मानले गेले आहे. त्यांच्या आयुष्याची आणि विचारांची ओळख करून देणारे हे संवादरुपी पुस्तक म्हणजे माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या आदराची निशाणी आहे. त्यांचा वैचारिक वारसा असे या पुस्तकाबाबत बोलणे हे अकाली होईल, पण कल्पनाही करता येणार नाही इतक्या व राजकीय शक्यतांचा पट त्यांनी इथे उघड केला आहे.