सुहास पळशीकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत.
'लोकशाही प्रक्रिया' आणि 'भारताचे राजकारण' हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. या विषयांवर त्यांनी मराठी व इंग्रजीतून लेखन केले आहे. सध्या ते Studies in Indian Politics (Sage) या नियतकालिकाचे मुख्य संपादक आहेत.
1947 ते 2007 या 60 वर्षांत भारतातील संसदीय व संसदबाह्य राजकारण कसे व किती बदलत गेले याचा जेष्ठ राजकीय विचारवंत सुहास पळशीकर यांनी मांडलेला विश्लेषणात्मक ताळेबंद.