Author

वसंत बापट | Vasant Bapat

प्रा. बापट यांचा जन्म 25 जुलै 1922 रोजी सातारा जिल्ह्यातील क-हाड येथे झाला. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स. प. महाविद्यालयात झाले (1948). त्यानंतर मुंबईतील ‘नॅशनल कॉलेज’ आणि ‘रामनारायण रुईया कॉलेज’ ह्या महाविद्यालयांतून मराठी आणि संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक होते. 1974 पासून मुंबई विद्यापीठातील गुरुदेव टागोर अध्यासनाचे प्राध्यापक होते. साहित्य अकादमीचे सदस्य होते. प्रा. बापट हे स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी झाले होते. 1942 च्या ‘चले जाव’ चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, ऑगस्ट 1943 ते जानेवारी 1945 पर्यंत ते तुरूंगात होते. 1947 ते 1982 पर्यंत ते मुंबई विद्यापीठात प्राध्यापक होते. 1983 ते 1988 पर्यंत ते सा. ‘साधना’चे संपादक होते. राष्ट्रसेवा दलाशी ते संलग्न होते. 1972 साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

लहानपणापासून बापटांवर राष्ट्र सेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. ‘बिजली’ (1952) ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. ‘अकरावी दिशा’ (1962),’सकीना’ (1972), आणि ‘मानसी’ (1977), हे त्याचे बिजलीनंतरचे काव्यसंग्रहातून त्यांच्या अनुभवांचे क्षेत्रही उत्त्तरोत्तर अधिकाधिक विस्तारत गेल्याचे दिसते. संस्कृत, बंगाली आणि इंग्रजी कवितेचा प्रभावही ह्या कवितेवर दिसून येतो. सामाजिक विषमता आणि अन्याय ह्यांच्या तीव्र जाणिवे बरोबरच यौवनाचा अभिजात डौल, निसर्गाच्या विभ्रम-विलांसाहून खटयाळ शृंगार व्यक्तविण्याची प्रवृत्ती, लावणीसारख्या जुन्या काव्यप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याचा रसिक प्रयत्न ह्यांच्या प्रत्यय त्यांच्या बिजलीनंतरच्या कवितेत येतो. त्यांच्या कवितेचे परिपक्व रुप मानसीमध्ये विशेषत्वाने जाणवते. ह्या काव्यसंग्रहातील त्यांची कविता मितभाषी; परंतु आशयदृष्टया अधिक गहन अशी आहे.

Author's books

शतकाच्या सुवर्णमुद्रा | Shatakachya Suvarmudra

120.00

आधुनिक मराठी कवितेचे एक शतक सरले; दुसरे उदयाला येण्याचा हा क्षण आहे. उत्कर्ष आणि अपकर्ष यांची आंदोलने समतोल मनाने झेलून परंपरेचे भान मात्र जागृत ठेवायला हवे. या छोट्याशा पुस्तकाचा हेतू एवढाच आहे. आपला परामर्श सर्वसमावेशक नसला तरी प्रातिनिधिक मात्र असला पाहिजे, या दृष्टीने टाकलेली ही केवळ पहिली पावले आहेत. एका शतकाच्या वाटचालीचा हा बोलका आलेख आहे, गेल्या शतकाने उचललेल्या पावलांचे ठसे आज सुवर्णमुद्रांसारखे वाटतात. त्यांच्यावर नजर टाकून उज्ज्वल भविष्याचा वेध घ्यायला हवा.

     

 

 

शिंग फुंकिले रणी | Shing Funkile Rani

120.00

जिथे जिथे
भारतावर प्रेम करणाऱ्या
माझ्या बंधुभगिनींचे
समुदाय जमतात
तिथे तिथे ही गाणी
खुशाल कोणीही म्हणावीत…

     

 

1 2