Author

विश्वास रघुनाथ पाटील | Vishwas Raghunath Patil

जन्म : 13 नोव्हेंबर 1928, रत्नागिरी

शालेय शिक्षण: पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी

उच्च शिक्षण : बी. ए., गोगटे कॉलेज, रत्नागिरी

मुंबई विश्वविद्यालयामधून एम. ए. विषय : प्राचीन सांस्कृतिक इतिहास

बालपणापासून वाचनाची व व्यायामाची आवड

नोकरी : 1964 ते 1986, भारत पेट्रोलियम, बॅलार्ड इस्टेट, मुंबई

एशियाटिक सोसायटी, मुंबईतील ग्रंथालयाचे आजीव सदस्य, ग्रंथनिवड समितीवर कार्यरत

अंदाजे 5000 ग्रंथांचा वैयक्तिक संग्रह

धर्म, तत्त्वज्ञान (मार्क्स, नित्शे, आर्थर कोसलर), मानसशास्त्र (फ्रॉईड) आणि अस्तित्ववाद
या विषयांवर विपुल लेखन

'नवी क्षितिजे' (1969 ते 1991) या वैचारिक त्रैमासिकाचे सहसंपादन

'झुंडीचे मानसशास्त्र' (प्रभात प्रकाशन, 2000) या गाजलेल्या ग्रंथाचे लेखन

'मानवी आक्रमक प्रवृत्ती' (वरदा बुक्स, पुणे, 1982) या ग्रंथाचे लेखन

'गांधीजींच्या शोधात' एरिक एरिक्सन यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद (प्रकाशक : नाना जोशी)

'मानसोपचार पद्धतीचे आद्यप्रणेते सिग्मंड फ्रॉइड' (मनोरमा प्रकाशन, 2009) या ग्रंथाचे लेखन

'होली वॉर : जिहाद व धर्मान्तर' - विश्वास पाटील व प्रा. मे. पुं. रेगे (प्रकाशक सत्यार्थ प्रकाशन, अरविंद थत्ते, सांगली)

कार्ल मार्क्स : व्यक्ती आणि विचार (पद्मगंधा प्रकाशन)

फ्रेडरिक नित्शे : जीवन आणि तत्त्वज्ञान (पद्मगंधा प्रकाशन)

मानसोपचार पद्धतीचे आद्यप्रणेते : सिग्मंड फ्रॉइड (मनोरमा प्रकाशन)

ललित, साहित्य मैफिल, अबकडई, दीपलक्ष्मी, लाजरी, परममित्र, कदंब, सनविवि, विवेक या नियतकालिकांसाठी विविध विषयांवर लेखन

रविवार सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती या वर्तमानपत्रांसाठी प्रासंगिक व समीक्षात्मक लेखन

निर्वाण : 12 डिसेंबर 2002, दादर, मुंबई

Author's books

झुंडीचे मानसशास्त्र | Zundiche Manasashastra

280.00

झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट अनेक लोकांच्या दृष्टीने फायद्याची असते. जगातील मोठमोठे कर्तबगार पुरुष, धर्मप्रवर्तक, साम्राज्यांचे संस्थापक, भिन्न-भिन्न विचारसरणींचे निष्ठावंत अनुयायी, प्रसिद्ध राजकारणपटू हे सर्वजण प्रच्छन्न मानसविशारद होते. झुंडींची मानसिक जडण-घडण कशी असते, हे या सर्वांना जणू जन्मतः कळते. या उपजत आणि अचूक ज्ञानाच्या जोरावरच ही मंडळी स्वत:चे श्रेष्ठत्व प्रस्थापित करू शकतात. झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट राजकारणामध्ये पुढारीपण करू इच्छिणाऱ्यांना निकडीची होऊन बसली आहे. हे ज्ञान असेल, तरच झुंडींवर ताबा चालवता येणे शक्‍य असते. अर्थात, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नसते. तथापि, हे ज्ञान असेल तर निदान ती व्यक्ती झुंडीच्या आहारी तरी जात नाही.

वाचावे कसे हे शिकवण्यासाठी “नवी क्षितिजे” हे त्रैमासिक दीर्घकाळ चालवणाऱ्या आणि थोडेच पण विशेष महत्वाचे गंभीर वैचारिक लेखन करणाऱ्या विश्वास पाटील यांनी लिहिलेले “झुंडीचे मानसशास्त्र” हे पुस्तक दोन वेगवेगळ्या पुस्तकांवर आधारित आहे. त्या दोन पुस्तकांचे लेखक वेगवेगळ्या कालखंडातील, वेगवेगळ्या देशांतील आणि वेगवेगळया भाषांतील आहेत. त्यातील पहिले पुस्तक आहे “द क्राउड”, ल बाँ यांनी लिहिलेले हे पुस्तक मूळ फ्रेंच भाषेतील असून त्याचा इंग्रजी अनुवाद 1896 मध्ये प्रसिद्ध झाला. दुसरे पुस्तक आहे “द ट्रू बिलिव्हर”, एरिक हॉपर या अमेरिकन लेखकाने 1951 मध्ये हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. विश्वास पाटील यांनी ती दोन पुस्तके अनुक्रमे “झुंडी” आणि “सच्चा अनुयायी” या स्वरूपात सुबोध मराठीत आणली, आणि झुंडीचे मानसशास्त्र हे एकसंध पुस्तक तयार केले. हे दोन्ही भाग परस्परांना पुरक आहेत, एवढेच नव्हे तर परस्परांचा आशय व विषय पुढे घेऊन जाणारे आहेत. 1978 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती जनपथ प्रकाशन, मुंबई यांच्याकडून आली आणि नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून 2020 मध्ये आली. चार दशकांनंतरही हे पुस्तक अधिकाधिक प्रस्तुत ठरते आहे.
(पहिली आवृत्ती – जनपथ प्रकाशन, मुंबई. 1978)