Ladhe Andhashraddheche | लढे अंधश्रद्धेचे
₹280.00लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) – १९८९ ते १९९९ या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी.
लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) – १९८९ ते १९९९ या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी.
विनोबा महाराष्ट्रात आले तोपर्यंत लाखो एकर जमीन दानात मिळाली होती. हजारो गावे ग्रामदान झाली होती.
भूदान-यज्ञादरम्यान अनेक विचार प्रकट झाले होते, अनेक कार्यक्रम पुढे आले होते. ही सगळी शिदोरी घेऊन विनोबा त्यांच्या प्रिय महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रापुढे त्यांनी हृदय मोकळे केले. यामुळेच त्यांच्या येथील अनेक भाषणांना वेगळ्याच जिव्हाळ्याचा स्पर्श आहे. या पदयात्रेतील त्यांच्या भाषणांच्या संपादनातून ‘महाराष्ट्रात विनोबा’ पुस्तकाचे चार भाग प्रकाशित झाले (1958-59).
या भाषणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती मराठीत आहेत. भारतभरच्या पदयात्रेत महाराष्ट्र आणि गुजरातचा अपवाद वगळता विनोबा हिंदीत बोलले. फक्त महाराष्ट्रात मराठीत. त्यांची मराठी वक्तृत्वशैली या पुस्तकामध्ये दिसते तशी साहजिकच अन्यत्र दिसत नाही. विनोबांच्या विविध विषयांवरील विचारांना संकलित-संपादित करून अनेक पुस्तके विभिन्न भाषांमध्ये तयार झाली आहेत. ती उपयोगी आहेतच. मात्र मूळ भाषणांमधील खुमारी त्यांच्यात असू शकत नाही.
आपले गाव हे एक कुटुंब आहे असे समजून त्यातील प्रत्येक व्यक्तीची कदर करायची, आपल्या गावापलीकडेही एक मोठा समाज आहे हे लक्षात घेऊन त्याच्याशी नातेसंबंध जोडायचे आणि ह्या सर्वांमधून आपले जगणे अधिक अर्थपूर्ण करायचे- अशी कामना आहे. ह्यालाच स्वराज्य असे म्हणतात. स्वराज्य हे साधन आहे आणि साध्यही. हे प्रत्यक्षात कसे करता येईल, त्यामध्ये कोणत्या अडचणी येतील, त्या अडचणींचे निराकरण कसे करायचे ह्याचा शोध म्हणजे स्वराज्याचा शोध.
मुसलमानांना आवडणारी अगर न आवडणारी, पण मुस्लिम समाजात चालू असणारी जी सामाजिक आंदोलने आहेत, त्या आंदोलनांकडे व मुस्लिमांच्या मनात घोळत असणाऱ्या प्रश्नांकडे मराठी वाचकांचे लक्ष वेधावे, एवढाच या टिपणांचा हेतू आहे. मुस्लिम समाजाचे मनोगत मराठी वाचकांसमोर आणण्याचे प्रयत्न फारसे होतच नाहीत. मुल्कपरस्तांनी या दृष्टीने जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नात सातत्य होते आणि वैविध्यही होते. असा एकटा हाच एक प्रयत्न होता म्हणून या उपक्रमाला महत्त्व आहे.
हाँसदांच्या कथांमधला आणखी एक कमालीच्या धारिष्ट्याचा भाग म्हणजे, त्यांनी हिंदू उच्च वर्णीयांच्या मुजोरीबरोबरीनेच धर्मादाय कामांच्या नावाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यांनी उभं केलेलं जाळं, त्यांची तथाकथित मूल्यशिक्षण व्यवस्था आणि त्यात फसलेला आदिवासी समाज पुढे आणताना जोल्हे म्हणजेच मुसलमान आणि त्यांनी केलेली घुसखोरी तसंच त्यांचं मूलवासी आदिवासींना अल्पसंख्याक करत नेण्याचं शिस्तबद्ध धोरण, हेही अधोरेखित केले आहे. शिवाय माध्यमांच्या आणि न्यायव्यवस्थेच्या निवाड्यांचाही लेखाजोखा आहेच. थोडक्यात, आपल्या धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी देशाचे चार आधारस्तंभ (विधिमंडळ, प्रशासन, न्यायव्यवस्था, माध्यमे) यांची लक्तरे एकीकडे वेशीवर टांगली आहेत, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळं असणाऱ्या मिशनऱ्यांचे आणि विस्तारवादी मुस्लिम मानसिकतेचेही वाभाडे काढले आहेत. हिंदूंमधल्या ‘आहे रे’ वर्गाचे दांडगेपण तर आहेच!
१८६६ ते १९१५ असे जेमतेम ४९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे सार्वजनिक आयुष्य तीन दशकांचे होते. नेक नामदार अशी त्यांची ओळख देशभर रूढ झाली. पण त्यांची सुरुवातीची ओळख सुधारकाग्रणी गो. ग. आगरकर व न्या. म. गो. रानडे यांचे शिष्य अशी होती. तर अखेरच्या काळातील ओळख मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरू अशी होती.
त्यांचे दहावे स्मृतीवर्ष आले तेव्हा, म्हणजे १९२४ मध्ये त्यांचे चरित्रलेखन स्पर्धा मुंबई विद्यापीठाने जाहीर केली. त्या स्पर्धेत पांडुरंग सदाशिव साने या २४ वर्षांच्या तरुणाने भाग घेतला, तेव्हा तो नुकताच एम.ए. झाला होता. त्या तरुणाने पुस्तक लिहायला सुरुवात तर लगेच केली, पण ते वाढत गेले आणि दरम्यान, स्पर्धेसाठी लेखन सादर करण्याची मुदत संपून गेली.
आणि मग ते हस्तलिखित, त्या तरुणाच्या दत्तो वामन पोतदार या शिक्षकाने एका प्रकाशकाकडे सोपवले. ते पुस्तक फेब्रुवारी १९२५ मध्ये प्रकाशित झाले. नामदार गोखले यांचे विस्तृत म्हणावे असे ते पहिले चरित्र आणि त्या तरुणाचे प्रकाशित झालेले ते पहिले पुस्तक. त्यानंतर पाच वर्षांनी तो तरुण, संपूर्ण महाराष्ट्रात साने गुरुजी या नावाने ओळखला जाऊ लागला.