वेध अंतर्वेध | Vedh Antarvedh
₹240.00
हाँसदांच्या कथांमधला आणखी एक कमालीच्या धारिष्ट्याचा भाग म्हणजे, त्यांनी हिंदू उच्च वर्णीयांच्या मुजोरीबरोबरीनेच धर्मादाय कामांच्या नावाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यांनी उभं केलेलं जाळं, त्यांची तथाकथित मूल्यशिक्षण व्यवस्था आणि त्यात फसलेला आदिवासी समाज पुढे आणताना जोल्हे म्हणजेच मुसलमान आणि त्यांनी केलेली घुसखोरी तसंच त्यांचं मूलवासी आदिवासींना अल्पसंख्याक करत नेण्याचं शिस्तबद्ध धोरण, हेही अधोरेखित केले आहे. शिवाय माध्यमांच्या आणि न्यायव्यवस्थेच्या निवाड्यांचाही लेखाजोखा आहेच. थोडक्यात, आपल्या धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी देशाचे चार आधारस्तंभ (विधीमंडळ, प्रशासन, न्यायव्यवस्था, माध्यमे) यांची लक्तरे एकीकडे वेशीवर टांगली आहेत, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळं असणाऱ्या मिशनऱ्यांचे आणि विस्तारवादी मुस्लीम मानसिकतेचेही वाभाडे काढले आहेत. हिंदूंमधल्या ‘आहे रे’ वर्गाचे दांडगेपण तर आहेच!
संपादकाच्या नावे व संपादकीय लेखनासाठी ओळखले जाणारे आजच्या काळातले एक मासिक आहे ‘पुरोगामी जनगर्जना’ आणि त्याचे संपादक आहेत डॉ.अभिजित वैद्य. स्वतःची अभ्यासांती बनलेली सुस्पष्ट व ठाम वैचारिक भूमिका आणि वृत्तपत्राच्या तुलनेत मासिक असल्यामुळे दीर्घ निर्बंधवजा विषयाचा सर्वांगीण वेध घेणाऱ्या अभ्यासू संपादकीय लेखनामुळे ‘पुरोगामी जनगर्जने’ला वैचारिक स्वरूप आणि स्वतःची वेगळी ओळख डॉ. अभिजित वैद्य यांच्यामुळे लाभली आहे. डॉ. वैद्य यांच्या पुरोगामी आणि मूल्याधिष्ठित भूमिकेचा प्रत्यय त्यांच्या प्रस्तुत पुस्तकातील प्रत्येक लेखात येतो. त्यामुळेच वाचकांना वर्ण्य विषयाच्या सर्व बाजूचे ज्ञान होते, तसेच त्यांची वैचारिक जनहिताची ठाम भूमिकाही समजून येते. डॉ. अभिजित वैद्यांचे सर्व लेख शैलीदार व वाचनीय आहेत. त्यांची मराठी भाषा व्यंग, उपहास, अतिशयोक्ती अशा विविध भाषिक आयुधांनी संपन्न आहे. अनेक लेख त्यामुळे साहित्यगुणांनी संपन्न होत अभिजाततेकडे झुकतात. या पुस्तकातील बहुसंख्य लेखांना ‘लॉंग शेल्फ लाईफ’ प्राप्त झाले आहे.
14 डिसेंबर 1947 ते 4 जानेवारी 2023 असे 75 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या सुनील देशमुख यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला, मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी पुढील पाच दशके अमेरिकेत वास्तव्य केले. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रांत उंच भरारी घेत असतानाच ते सामाजिक जीवनात कायम सक्रिय राहिले. 1994 नंतरच्या 28 वर्षांत त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) मार्फत मराठी साहित्य व महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार योजना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राबवली. अशा या सुनील देशमुख यांच्या वैचारिकतेचा गाभा आणि आवाका कसा होता त्याची झलक या पुस्तकातून पाहायला मिळते.
6 जानेवारी 2020 रोजी पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या स्थापनेचे 200 वे वर्ष सुरू झाले. त्या दिवशी भल्या पहाटे मी डेक्कन कॉलेज परिसरात फिरायला गेलो. तेव्हा 150 वर्षांहून अधिक वयाचे केशवराव भेटले, अगदी अनपेक्षितपणे. तेव्हा त्यांच्याशी झालेला संवाद मुलाखतीच्या स्वरूपात नंतरच्या साधना साप्ताहिकाच्या अंकात प्रसिद्ध केला. त्यानंतरच्या दोन वर्षांच्या काळात केशवरावांच्या आणखी दहा मुलाखती झाल्या, त्याच ठिकाणी आणि त्याच वेळी! केशवरावांच्या मुलाखती पूर्वनियोजित नव्हत्या, पण बहुतांश मुलाखती कोणता तरी एखादा विषय केंद्रस्थानी ठेवूनच झाल्या. तरुणाई, पत्रकारिता, आरक्षण, उदारीकरण पर्व, वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट, शिक्षण, असंसदीय भाषा, न्यायव्यवस्था, काँग्रेस-भाजप, निवडणूक आयोग इत्यादी.
केशवराव मुळात कमी बोलतात, संक्षिप्त उत्तरे देतात, त्यात प्रतिप्रश्नच जास्त असतात. त्या उत्तरात किंचितसा उपरोध असतो, तिरकसपणा असतो आणि समाज जीवनातील विसंगतीवर बोट ठेवून मर्मभेदी भाष्यही असते. मात्र प्रत्येक मुलाखत रंगात आली असतानाच, ‘चला, उशीर झालाय, निघतो मी’ या वाक्याने समारोप करतात. म्हणजे त्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर न देता निघून जातात. ते असे का करतात; त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देणे सोयीचे वाटत नाही, की देताच येत नाही ?
एन. राम सांगत आहेत 145 वर्षांची परंपरा असलेल्या ‘द हिंदू’ या दैनिकाच्या वाटचालीबद्दल.
शेखर गुप्ता सांगत आहेत ‘द इंडियन एक्सप्रेस’, ‘इंडिया टुडे’ आणि ‘द प्रिंट’ येथील स्वतःच्या कारकिर्दीबद्दल.
नरेश फर्नांडिस सांगत आहेत ‘स्क्रोल’ या डिजिटल पोर्टलवरील संपादनाबाबत…
हे तिन्ही संपादक इंग्रजी पत्रकारितेत आहेत, देशाच्या तीन टोकांवरील तीन महानगरांत (चेन्नई, दिल्ली, मुंबई) राहून तिघांनी पत्रकारिता केली आहे. तिघे तीन वेगवेगळ्या पिढ्यांतील आहेत, तिघांनीही पूर्णतः वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम केले आहे, तिघांच्याही दृष्टीकोनांत फरक आहे, तिघांनीही पत्रकारिता गांभीर्याने केलेली आहे आणि तिघांचीही पत्रकारितेच्या मूल्यांशी असलेली बांधिलकी पक्की आहे.
महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने 1994 पासून मराठी साहित्य पुरस्कार, तर 1996 पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार दर वर्षी दिले जातात. या पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी स्मरणिका किंवा विशेषांक दर वर्षी प्रसिद्ध होत आले आहेत. मात्र 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात दर वर्षी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखती असलेले अंक साधना साप्ताहिकाने प्रकाशित केले. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य ही चतुःसूत्री समोर ठेवून या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
पाच वर्षांत समाजकार्य विभागात दर वर्षी पाच पुरस्कार दिले गेले. त्यामध्ये समाजकार्य जीवनगौरव, कार्यकर्ता पुरस्कार प्रबोधनासाठी, कार्यकर्ता पुरस्कार संघर्षासाठी, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार आणि विशेष कार्य पुरस्कार किंवा युवा पुरस्कार अशी वर्गवारी केलेली होती. त्या पाच वर्षांतील समाजकार्य पुरस्कारप्राप्त सर्व म्हणजे एकूण 25 व्यक्तींच्या मुलाखतीचे संकलन असलेले हे पुस्तक आहे.