मे 1971 मध्ये, वयाच्या विशीत असलेले कायद्याचे विद्यार्थी हेमंत गोखले बांगलादेश मुक्तिसंग्रामातील निर्वासितांना मदत करण्यासाठी गेले होते. त्यावर आधारित दहा भागांची लेखमाला त्यांनी जून ते सप्टेंबर 1971 मध्ये साधना साप्ताहिकात लिहिली होती. त्यानंतर जवळपास पन्नास वर्षांनी म्हणजे मार्च 2020 मध्ये, वयाच्या सत्तरीत असलेले सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले व्याख्यानाच्या निमित्ताने बांगलादेशला गेले होते. या भेटीवर आधारित दहा भागांची लेखमाला त्यांनी जानेवारी ते एप्रिल 2021 मध्ये साधना साप्ताहिकात लिहिली होती. त्या दोन्ही लेखमालांचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचा पूर्वार्ध विप्लवी बांगला म्हणजे संघर्षशील बांगलादेश आणि उत्तरार्ध सोनार बांगला म्हणजे विकसनशील बांगलादेश. इ.स. 2020-21 हा काळ म्हणजे शेख मुजिबुर रहेमान यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष, म्हणून या पुस्तकाला विशेष औचित्य आहे.
हे लिखाण म्हटले तर आठवणींचे आहे, म्हटले तर हे प्रवासवर्णन आहे, आणि यात काही मुलाखतीही आहेत. पण माझ्या दृष्टीने हे पुस्तक म्हणजे बांगलादेशाच्या निर्मितीच्या काळातील व त्यानंतरच्या मोठ्या स्थित्यंतराचा आलेख आहे.
– माधव गोडबोले (निवृत्त केंद्रीय गृह व न्याय सचिव)
Reviews
There are no reviews yet.