₹100.00 ₹80.00
युवा दिवाळी अंक 2025 | Yuva Diwali Ank 2025
25 ते 35 वर्षे या वयोगटांतील हे पाच तरुण-तरुणी विविध प्रांतांतील, विविध समाजघटकांतील आहेत, विविध कौटुंबिक व शैक्षणिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत आणि अर्थातच विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. तरीही त्यांच्यात समान असे काही निश्चित आहे, ते आज-उद्याच्या युवा वर्गाला विशेष उपयुक्त आहे.
Related products
बालकुमार दिवाळी अंक 2025 | Balkumar Diwali Ank 2025
1880 ते 1936 असे जेमतेम 56 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या प्रेमचंद यांनी हिंदी आणि उर्दू भाषांमध्ये अनेक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या. त्यातून त्यांनी तळागाळातील विषय हाताळले, आशयसंपन्नता व कलात्मक मूल्ये या निकषांवर त्यांचे लेखन पूर्ण उतरले. त्यामुळे अखिल भारतीय पातळीवर ते कमालीचे लोकप्रिय ठरले. त्यांनी लिहिलेल्या एकूण कथांची संख्या आहे तीनशे. त्यातील पाच कथांचे अनुवाद असलेला हा अंक आहे. या सर्व कथांच्या केंद्रस्थानी बालकुमार वयोगटातील मुले-मुली आहेत, त्यांचे भावविश्व आहे.
सुनीलकुमार लवटे यांची मुलाखत | Sunilkumar Lawate Yanchi Mulakhat
1901 ते 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सार्वजनिक आयुष्य सात दशकांचे होते. त्या काळात त्यांनी केलेल्या विपुल व विविधांगी लेखनाचे संकलन व संपादन करण्याचे काम डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने हाती घेतले आणि पुढील पाच वर्षे पूर्ण वेळ सातत्याने व चिकाटीने कार्यरत राहून पूर्ण केले.
त्यातून आकाराला आलेला प्रकल्प म्हणजे ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’.
तब्बल दहा हजार पानांचा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने एकूण 18 खंडांमध्ये प्रकाशित केला आहे. त्या निमित्ताने, डॉ. लवटे यांची दोन भागांतील दीर्घ व्हिडिओ मुलाखत साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी घेतली, त्या मुलाखतीचे शब्दांकन असलेली ही पुस्तिका आहे.
Saptahik Sadhana Diwali 2024 | साप्ताहिक साधना दिवाळी 2024
हा अंक तयार करताना दोन ते तीन हजार शब्दांचे लेख व वर्तमानाशी निगडित आशय-विषय आणि जास्तीत जास्त नवे लेखक अशी मध्यवर्ती कल्पना समोर ठेवली. ताज्या घटना-घडामोडींचे निमित्त करून हे 13 लेख प्रसिद्ध करीत आहोत.
Balkumar Diwali Ank | बालकुमार दिवाळी अंक
सहा विषयांचे अंतरंग उलगडून दाखवणारे सहा लेख या अंकात आहेत. त्या त्या विषयांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारे आणि त्या त्या विषयांचे समाजजीवनाशी असलेले नाते उलगडून दाखवणारे हे लेख, त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून लिहून घेतले आहेत. या सर्वांनी आपापल्या विषयात अध्यापन व संशोधन तर केलेले आहेच, शिवाय आपापला विषय समाजजीवनातील विविध क्षेत्रांत रुजविण्यासाठी या ना त्या प्रकारे योगदान दिलेले आहे.
एक मैफल | Ek Maifal
ग्वाल्हेर घराण्याची प्रख्यात गायिका म्हणून विदुषी नीला भागवत यांची भारतात व परदेशातही ओळख आहे. सुरुवातीला, संगीताच्या जोडीने त्यांनी नृत्य, नाट्य, या कलेच्या प्रांतात, तसेच मराठी साहित्य व समाजशास्त्राचा अभ्यास व काही काळ प्राध्यापकी अशी विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. पण पुढील टप्प्यांत संगीत हेच त्यांच्या जीवनाचं श्रेयस व प्रेयस बनलं असं दिसतं. एक प्रयोगशील, अनवट वाटा धुंडाळणारी गायिका, आपली डावी विचारसरणी व स्त्रीवादी भूमिका आपल्या गायन कलेतूनही सुस्पष्टपणे व्यक्त करणारी सर्जनशील कलाकार, अशी त्यांची प्रतिमा भारतात व परदेशांतही आहे. संगीत क्षेत्रात ही काहीशी दुर्मीळ बाबच म्हणावी लागेल. अशा समाजाभिमुख कलाकार व्यक्तित्वाचा वेध घेणं म्हणजे तिच्या जडणघडणीचा काळ व अवकाश यातील ताणे-बाणे समजून घेणं होय.





Reviews
There are no reviews yet.