Shop

Saleनवी पुस्तके

युवा दिवाळी अंक 2025 | Yuva Diwali Ank 2025

80.00

25 ते 35 वर्षे या वयोगटांतील हे पाच तरुण-तरुणी विविध प्रांतांतील, विविध समाजघटकांतील आहेत, विविध कौटुंबिक व शैक्षणिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत आणि अर्थातच विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. तरीही त्यांच्यात समान असे काही निश्चित आहे, ते आज-उद्याच्या युवा वर्गाला विशेष उपयुक्त आहे.

Saleनवी पुस्तके

बालकुमार दिवाळी अंक 2025 | Balkumar Diwali Ank 2025

60.00

1880 ते 1936 असे जेमतेम 56 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या प्रेमचंद यांनी हिंदी आणि उर्दू भाषांमध्ये अनेक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या. त्यातून त्यांनी तळागाळातील विषय हाताळले, आशयसंपन्नता व कलात्मक मूल्ये या निकषांवर त्यांचे लेखन पूर्ण उतरले. त्यामुळे अखिल भारतीय पातळीवर ते कमालीचे लोकप्रिय ठरले. त्यांनी लिहिलेल्या एकूण कथांची संख्या आहे तीनशे. त्यातील पाच कथांचे अनुवाद असलेला हा अंक आहे. या सर्व कथांच्या केंद्रस्थानी बालकुमार वयोगटातील मुले-मुली आहेत, त्यांचे भावविश्व आहे.

Saleनवी पुस्तके

प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध | Pravahasathi Pravahaviruddha

560.00

2013 ते 2023 या दहा वर्षांत मी साधना साप्ताहिकात चारशे संपादकीय लेख लिहिले, त्यातील सर्वोत्तम शंभर लेख या पुस्तकात घेतले आहेत. त्यामुळे, कोणते विषय आलेले नाहीत किंवा कोणत्या विषयांवर आणखी लिहायला हवे होते, अशा प्रकारच्या अपेक्षा या पुस्तकातील लेख वाचून व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. उर्वरित तीनशे लेखांमध्ये बरेच वेगवेगळे विषय येऊन गेलेले आहेत. या पुस्तकात निवडलेले लेख असे आहेत, जे परिपूर्णतेच्या जवळ जाणारे आहेत, जे आज-उद्याच्या वाचकांना वाचायला आवडतील आणि मुख्य म्हणजे त्या दशकात साधनाची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत काय भूमिका होती हे दाखवू शकतील.
अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होत असतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा वा करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच, एका मर्यादनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. ‘सम्यक सकारात्मक’ हा माझा दृष्टीकोन आहे, त्यातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल. अर्थातच, एका प्रवाहासाठी दुसऱ्या प्रवाहाविरुद्ध आणि एका प्रवाहासाठी त्याच प्रवाहाविरुद्धही ! इथे मला विरोधासाठी विरोध अपेक्षित नाही, रचनात्मक वाटचाल अभिप्रेत आहे…

विनोद शिरसाठ
संपादक (साप्ताहिक व प्रकाशन)

Saleनवी पुस्तके

श्रीकांत भाग 3 व 4 | Shrikant Bhag 3 & 4

320.00

‘श्रीकांत’ हे नोबेल विजेता साहित्यिक रोमां रोलांचे अत्यंत आवडते पुस्तक होते. ही एक प्रकारची भ्रमणगाथा आहे आणि हे भ्रमण करताना त्याला दिसलेल्या समाजाचे व जीवनाचे दर्शन श्रीकांत घडवतो. गो. नी. दांडेकरांच्या कुण्या एकाची भ्रमणगाथावर याची दाट छाया जाणवते, पण तिथे श्रीकांतमधले अपूर्व व्यक्तिदर्शन नाही व एवढा विशाल पटही नाही. एक प्रकारे हे शरद बाबूंचे आत्मचरित्र आहे. त्यांची भटकण्याची वृत्ती, ब्रह्मदेशातली नोकरी, विचारसरणी, जातिभेदांविषयी तिरस्कार, पारतंत्र्याचा तिटकारा, सहृदय स्वभाव, पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धारिष्ट, मनातली एक प्रकारची उदासीनता हे सर्व ‘आवारा मसीहा’चे जगणे श्रीकांत आणि शरदबाबू या दोघांच्यात समान दिसते.

Saleनवी पुस्तके

श्रीकांत भाग 1 व 2 | Shrikant Bhag 1 & 2

280.00

‘श्रीकांत’ हे नोबेल विजेता साहित्यिक रोमां रोलांचे अत्यंत आवडते पुस्तक होते. ही एक प्रकारची भ्रमणगाथा आहे आणि हे भ्रमण करताना त्याला दिसलेल्या समाजाचे व जीवनाचे दर्शन श्रीकांत घडवतो. गो. नी. दांडेकरांच्या कुण्या एकाची भ्रमणगाथावर याची दाट छाया जाणवते, पण तिथे श्रीकांतमधले अपूर्व व्यक्तिदर्शन नाही व एवढा विशाल पटही नाही. एक प्रकारे हे शरद बाबूंचे आत्मचरित्र आहे. त्यांची भटकण्याची वृत्ती, ब्रह्मदेशातली नोकरी, विचारसरणी, जातिभेदांविषयी तिरस्कार, पारतंत्र्याचा तिटकारा, सहृदय स्वभाव, पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धारिष्ट, मनातली एक प्रकारची उदासीनता हे सर्व ‘आवारा मसीहा’चे जगणे श्रीकांत आणि शरदबाबू या दोघांच्यात समान दिसते.

Saleनवी पुस्तके

सव्यसाची | Savyasachi

320.00

स्वातंत्र्य लढ्याची राजकीय पार्श्वभूमी असलेली ‘सव्यसाची’ ही कादंबरी म्हणजे शरद साहित्याचे सर्वोच्च शिखर आहे. नरहर कुरुंदकरांनी या भव्य कादंबरीचे भरभरून कौतुक केले आहे. कलकत्त्याचे त्या वेळचे पोलीस कमिशनर शरच्चंद्रांना म्हणाले होते, “शरद बाबू, कुठेही आम्ही क्रांतिकारकांना पकडल्यावर त्यांच्याकडे दोन पुस्तकं सापडतात, ‘गीता’ आणि ‘सव्यसाची’. या कादंबरीने क्रांतिकारकांना वेड लावलं आहे.”
क्रांती व स्वातंत्र्याच्या भव्य स्वप्नाने भारावलेला तिचा साहसी नायक सव्यसाची कोणत्या क्रांतिकारकावरून घेतला आहे, याविषयी अनेक तर्क केले जातात.
रासबिहारी बोस, अरविंद घोष, सुभाषचंद्र बोस वगैरेंची नावे येतात. पण यातील कोणी एक नव्हे तर या सर्वांच्या व्यक्तिमत्त्वांची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये एकत्र झाल्यासारखी वाटतात.

Saleनवी पुस्तके

संन्याशाच्या डायरीतून | Sannyashachya Dayaritun

320.00

स्वामीजींचे महत्त्व वाढण्यास, त्यांना प्रभावशाली नेते बनण्यास इतिहासाने खरोखरच नाट्यपूर्ण प्रसंग व संधी उपलब्ध करून दिली. हैद्राबाद संस्थानात एकीकडे असलेली अनिर्बंध सरंजामशाही व दुसरीकडे असलेले कमालीचे दारिद्र्य व मागासलेपण यांच्यामधील परस्पर क्रिया-प्रतिक्रियांतून शोषण मात्र निःसंकोचपणे बोकाळले होते. जमीनधारणेचा प्रश्न प्रामुख्याने सर्वांपुढे उभा होता. त्या प्रश्नावरून ग्रामीण भागात चोहोकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रझाकार दल, कम्युनिस्ट, सरंजामी वतनदार, समाजकंटक आणि नफेखोर या सर्वांनी मिळून धुमाकूळ घातला होता. त्यामुळे बराच काळपर्यंत पृथ्वीवर नरक निर्माण केला होता.
अकनूर, मचलपल्ली येथील भीषण घटना आणि त्यांसारख्या अन्यत्रही लक्षावधी मूक जनतेवर चाललेल्या अत्याचारांमुळे मोठी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अतिरेकी विचाराच्या मंडळींना आपल्या दृष्टीने या परिस्थितीचा लाभ करून घेण्यास एक संधी मिळाली. प्रश्न मुख्यतः सामाजिक व आर्थिक स्वरूपाचा होता. अर्थात त्यात जातीय व राजनैतिक प्रश्नांचाही गुंता होताच. हे दुखणे नाहीसे करण्यासाठी मोठ्या स्वरूपाची व थोडीशी किचकट अशी शस्त्रक्रिया करणे अवश्य होते. ती शस्त्रक्रिया आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ध्येयनिष्ठेने व चिकाटीने स्वामीजींनी केली.

पी. व्ही. नरसिंह राव (प्रस्तावनेतून)

नवी पुस्तके

भूमिका विशेषांक | Bhumika Visheshank

50.00

क्षितिज पटवर्धन लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकाचा 50 वा प्रयोग पुण्यात होत आहे. त्या निमित्ताने साधना साप्ताहिकाने विशेषांक तयार केला आहे. त्याचे प्रकाशन 15 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाआधी झाले आहे. लेखक आणि दिग्दर्शक या दोघांनी या नाटकाच्या लेखनामागील व दिग्दर्शनाची प्रक्रिया उलगडून सांगणारे दीर्घ लेख या अंकासाठी लिहिले आहेत. आणि तीन दशकांनंतर मराठी रंगभूमीवर या नाटकाद्वारे दमदार पुनरागमन करणारे अभिनेते सचिन खेडेकर यांची विनायक पाचलग यांनी घेतलेली दीर्घ मुलाखतही या अंकाचे मोठे आकर्षण आहे. शिवाय, या नाटकात विविध पात्र रंगवणाऱ्या समिधा गुरु, सुयश झुंजुरके, जाई खांडेकर, जयश्री जगताप व अतुल महाजन या पाच कलाकारांचे लेखही आहेत. नाटकातील विविध प्रसंगांच्या छायाचित्रांसह तयार केलेला हा बावन्न पानांचा अंक पूर्णतः बहुरंगी आहे.

1 2 30