सत्यकथा : अन्यायाच्या आणि संघर्षाच्या (व्यक्तिचित्रे) – तळागाळातल्या समूहांची बाजू उचलून धरणाऱ्या एका वकिलाने, त्याच्या संपर्कात आलेल्या सामान्य माणसांच्या लिहलेल्या खऱ्याखुऱ्या कथा.
शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची (रिपोर्ताज) – महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा, ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागात भ्रमंती करून टिपलेली क्षणचित्रे.
स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास (चरित्र) – हरित क्रांतीच्या प्रणेत्यांपैकी एक असलेले कृषीवैज्ञानिक एम. एस. स्वामिनाथन यांचे व्यक्तित्व, विचार व कार्य यांचा वेध घेणारे पुस्तक.
तात्पर्य (कुमारकथा) – युवा साहित्य अकादमी विजेत्या लेखकाने त्याच्या वयाच्या विशीत लिहलेल्या व साधनात आठ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या नऊ बालकुमार कथा.