Shop

Saleनवी पुस्तके

Pariwartnache Don Paik | परिवर्तनाचे दोन पाईक

60.00

आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.

 

     

Poshindyache Aakhyan | पोशिंद्याचे आख्यान

280.00

शेतीचा प्रश्न हा प्रामुख्याने राजकीय आहे. तसेच तो फक्त शेतकऱ्यांच्या जीवन-मरणापुरताच मर्यादित नाही, याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी लागेल. जगाच्या इतिहासात अशा जाणिवेचे दाखले मोजकेच आहेत; आणि वर्तमान तर निराशाजनक आहे. त्यामुळे शोषणाच्या या दुष्टचक्रात भरडून निघण्याची वेळ प्रत्येकावर येणे निश्चित आहे. शेतकरी जात्यात आहे. तर शहरं सुपात. शेतीच्या गंभीर प्रश्नाचे वास्तव समजून घेतले तर कदाचित ती वेळ टळेल!

अशा परिस्थितीत ग्रामीण भवतालाची जाण असलेला, शेतकरी व शेती यांच्याबद्दल डोळस आस्था असलेला आणि अभ्यास करून लिहिणारा पत्रकार, शेतीच्या उपभोक्तावर्गाला आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे इनपुट्स देऊ शकतो. रमेश जाधव या तरुण पत्रकाराच्या अशा लेखांचा हा संग्रह आहे.

गेल्या पाच वर्षांतील शेतीप्रश्नाचे वास्तव या लेखांतून मांडले आहे. सत्तेवर येण्यापूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृती यातील तफावत, अनेक बाजूंनी तपासून पाहिली आहे. थेट शेतीविषयक घटनांशिवाय मराठा आरक्षण, अण्णा हजारेंचे आंदोलन, गोवंशहत्याबंदी इत्यादी घडामोडींवर चर्चा करताना मूळ विषयाचा विस्तृत पट उभा राहतो. आकडेवारी आणि तांत्रिक तपशिलांसह लेखकाने घेतलेल्या रोखठोक भूमिकांमुळे मांडणीत नेमकेपणा आला आहे. भाषेतील संयमित उपरोधातून लेखकाची साहित्याची जाण दिसून येते. तात्कालिक घटनांच्या संदर्भातून शेतीच्या मूलभूत समस्यांची ललित भाषाशैलीने पुनर्मांडणी करणारा हा दस्तऐवज आहे.

– विनय हर्डीकर

     

 

Prashna Tumcha Uttar Dabholkaranche । प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे

80.00

हत्या झाली त्याच्या चार महिने आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची १०० मिनिटांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यांना सर्वत्र विचारले जाणारे ते २५ प्रश्न आणि त्यांची दाभोलकरांनी मुलाखती दरम्यान दिलेली उत्तरे यांचा समावेश या पुस्तिकेत आहे.

     

Pudhe Janyashathi mage valun pahtana | पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना

70.00

२०१७ च्या युवक दिनाच्या निमित्ताने अनिल अवचट, अभय बंग, आनंद नाडकर्णी या तीन डॉक्टरांची विवेक सावंत यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत.

     

Purnasatya | पूर्णसत्य

240.00
पूर्णसत्य (आत्मकथन) – ललित लेखकाचे व निवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याचे हे पुस्तक म्हणजे गुजराती भाषेतील पहिले दलित आत्मकथन.

     

Rashtriya Ekatmata aani Bharatiya Musalman | राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

240.00
हमीद दलवाई यांच्या मते- मुस्लिम मन हे कुराण, हदीस, पैगंबरांचे जीवन व इस्लामिक परंपरा यांच्या आधारेच बनते. सनातनी व मूलतत्त्ववादी हे इस्लाममध्ये पूर्ण धर्म व परिपूर्ण समाज आहे, असे मानतात. त्यांच्या दृष्टीने पैगंबरसाहेबांनी जो प्रयोग केला, त्याचे फक्त अनुकरण करणे व कोठल्याही परिस्थितीत चिकित्सा न करणे, हे आपले काम आहे. या भूमिकेतूनच जे मुस्लिम मन बनते, ते धर्मसुधारणेस व समाज- प्रबोधनास कसे तयार होणार?
भाई वैद्य (प्रस्तावनेतून)

     

Saleनवी पुस्तके

Rugnanchya Chashmyatun | रुग्णांच्या चष्म्यातून

100.00
एकनाथांनी सांगितलं होतं, “रोग गेलियाचे लक्षणे, रोगी नेणे, वैद्य जाणे” त्याप्रमाणे लोहिया यांनी ‘रुग्णांच्या चष्म्यातून’ सध्याची वैयक्तिक व सामाजिक आरोग्यावस्था दाखवत त्यातून सुव्यवस्थेकडे जाण्याचे सूचनही केलं आहे. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. डॉ. लोहिया यांचे वाचन अद्ययावत असल्यामुळे त्यांनी प्रत्येक प्रकरणाचा आरंभ हा नेमक्या व चपखल अवतरणाने केला आहे. त्यातून विशाल विचारपटाची पार्श्वभूमी तयार होते. हे पुस्तक, वाचकाला एकाच वेळी डॉक्टर व रुग्ण ह्या दोघांच्या चष्म्यातून पाहण्याची काळानुरूप दृष्टी देण्याचं कार्य करणार आहे.
– अतुल देऊळगावकर (प्रस्तावनेतून)

     

1 12 13 14 26