Gulamgiritun Gauravakade | गुलामगिरीतून गौरवाकडे
₹160.00गुलामगिरीतून गौरवाकडे (आत्मचरित्र) – एका गुलामाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा पुढे अमेरिकेतील नामवंत शिक्षणतज्ञ झाला; त्याच्या ‘अप फ्रॉम स्लॅव्हरी’ या आत्मकथनाचा हा अनुवाद. शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील ‘गुलामांचे जगणे’ कसे होते ते दाखवणारे पुस्तक.
Melghat : Shodh Swarajyacha | मेळघाट : शोध स्वराज्याचा
₹160.00आपले गाव हे एक कुटुंब आहे असे समजून त्यातील प्रत्येक व्यक्तीची कदर करायची, आपल्या गावापलीकडेही एक मोठा समाज आहे हे लक्षात घेऊन त्याच्याशी नातेसंबंध जोडायचे आणि ह्या सर्वांमधून आपले जगणे अधिक अर्थपूर्ण करायचे- अशी कामना आहे. ह्यालाच स्वराज्य असे म्हणतात. स्वराज्य हे साधन आहे आणि साध्यही. हे प्रत्यक्षात कसे करता येईल, त्यामध्ये कोणत्या अडचणी येतील, त्या अडचणींचे निराकरण कसे करायचे ह्याचा शोध म्हणजे स्वराज्याचा शोध.
Kahani Pachgavchi | कहाणी पाचगावची
₹160.00कहाणी पाचगावची (सामाजिक संशोधन) – चंद्रपूर जिल्ह्यातील पाचगाव या लहानशा खेड्याने मागील दहा वर्षांत स्वतःचा कायापालट करून घेतला, त्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास- संशोधन करून लिहिलेले पुस्तक.
Madhughat | मधुघट
₹160.00मधुघट (लेखसंग्रह) – शेक्सपिअरवरील पाच आणि टॉलस्टॉय , झिवागो, रवींद्रनाथ, सुभाषबाबू, जेन ऑस्टिन इत्यादींवरील आठ अशा एकूण १३ लेखांचा संग्रह.
Vivekacha Awaz । विवेकाचा आवाज
₹160.00‘विवेकवाद’ हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. मात्र एकाच वेळेला हे सुख भौतिक आहे, बौद्धिक आहे, भावनिक आहे, नैतिक आहे आणि सर्जनशील आहे. दुसऱ्या बाजूला, हे सुख अखिल मानव जात, अखिल प्राणीमात्र आणि निसर्ग यांच्याशी सुसंगत आहे. तिसऱ्या बाजूला, हे सुख ज्या वेळी अस्तित्वात येतं, त्या वेळी साध्य-साधन शुचिता पाळली जाते. त्यामुळे अशा सम्यक आणि व्यापक अर्थाने ‘विवेकवाद’ हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.
Sane Gurujincha Pandharpur Mandir Pravesh Ladha | साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा
₹160.001 मे 1947 रोजी गुरुजींनी अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठीही खुले व्हावे यासाठी उपोषण सुरु केले… आणि मग दहा दिवसांच्या उपोषणानंतर ते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले. तो एकूण घटनाक्रम भारतीय समाजजीवनाच्या कुरूपतेचे दर्शन घडवणारा होता, मात्र शतकानुशतकांचे जडत्व लाभलेल्या रूढी परंपरा (उदात्त ध्येयवादाच्या बळावर) मोडीत काढता येतात, याची प्रचिती देणाराही होता. त्याची एक झलक अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.
Shyamchi Aai | श्यामची आई
₹160.00अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे? ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’मध्ये आहे, तसे गुरुजींच्या ‘श्यामची आई’ मध्येही आहे.
-आचार्य अत्रे